शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बलिदान अन् त्यागाच्या परंपरेमुळे उदगीरचे नाव अजरामर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST

उदगीर : मराठी साम्राज्याला ऊर्जितावस्था प्राप्त करून देणाऱ्या उदगीरच्या लढाईत मराठ्यांचा विजय झाला. स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र, हैदराबाद ...

उदगीर : मराठी साम्राज्याला ऊर्जितावस्था प्राप्त करून देणाऱ्या उदगीरच्या लढाईत मराठ्यांचा विजय झाला. स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र, हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या चळवळीतील असंख्य लढवय्या त्यागमूर्तींची जीवने आदर्शप्रत इतिहासाने नोंदविली. त्यानंतरही भाई श्यामलालजी, भाई बन्सीलालजी, स्वामी रामानंद तीर्थ यांच्यापासून ते सामाजिक आयुष्य वेचणाऱ्या डॉ. ना. य. डोळे यांच्यापर्यंत पावन परंपरेचे तीर्थक्षेत्र येथील मातीत विस्तारत गेले. याच बलिवेदीच्या पायावर आधुनिक कळस कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी धाराशिवकर यांच्या कारगिल युद्धातील बलिदानाने रचला. त्यामुळे उदगीरचे नाव इतिहासात अजरामर झाले.

उदगीरमध्ये पंडित श्यामलालजी व पंडित बन्सीलालजी यांनी खेड्यापाड्यात आर्य समाज मंदिरे, आर्यदल, व्यायामशाळा स्थापन करून रझाकरांच्या अन्यायाविरोधात समाजमनात चीड निर्माण केली. त्यांना माधवराव घोणसीकर, संग्रामप्पा वकील, पंडित. कर्मवीरजी, प्रल्हाद भजनिक, अमृतराव मास्तर, दत्तात्रय पारसेवार, मोतीलालजी, आदी मंडळींचे सक्रिय योगदान लाभले. उदगीर, तिरुका, घोणसी, कौळखेड, तोंडचीर या भागांतील अनेक जणांनी हौतात्म्य पत्करले.

मराठवाडा मुक्ती संग्रामात रझाकार अन् निजामाविरुद्ध दोन हात करणाऱ्या किसान दलातील तरुणांची हत्तीबेट व रामघाटाचा डोंगर ही दोन तीर्थक्षेत्रे होती. मने पेटून उठलेल्या हुतात्मा किसनगीर गिरी, अप्पाराव पाटील कौळखेडकर, माणिकराव मुळे डोणगावकर, गंगाधरराव साकोळकर पाटील, गंगाराम रोडगे, निवृत्ती खटके, चनवीर देवर्षे, दिगंबर मुळे, दत्तूगीर तोंडचिरकर, नरसिंग लोहार, पंढरी सोनार, विठ्ठलराव पाटील, नरसिंग वस्ताद चाकूरकर, प्रभू बिरादार, यशवंतराव सायगांवकर, निवृत्ती गायकवाड यांच्यासह हजारो तरुणांनी ७ मे १९४८ रोजी किसान दलाची स्थापना केली. निजामाने २ ऑगस्ट १९४८ रोजी तोंडचिरवर हल्ला केला. या हल्ल्यात किसनगीर गिरी धारातीर्थी पडले. नंतर दहा दिवसांनी दुसरा हल्लाही रजाकारांनी तोंडचिरवर केला. कोणतीही साधनसामग्री, सत्ता नसताना या मावळ्यांनी निजामी व रजाकारी शक्तीला तोंड दिले. या लढाईत अट्टरग्याच्या टोळीने रामघाट डोंगरावर पराक्रमाची शर्थ केली. महंमद फजलचा अमानुष अत्याचार थांबविण्यासाठी किसान दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याची हत्या केली. रझाकारांनी अप्पाराव पाटील कौळखेडकर यांच्या अतिभव्य वाड्याची होळी केली. १७ सप्टेंबर १९४८ ला निजामाचे सहा ट्रक लष्कर हत्तीबेटाभोवताली दाखल झाले. बेटाला वेढा देऊन त्यावर चढाई करतानाच किसान दलाच्या जवानांनी गोळीबार सुरू केला. त्यात निजामाचे ६० शिपाई ठार झाले. हत्तीबेटाचा सुगावा निजामाला लागल्याने पुन्हा हल्ला होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन किसान दलाने हत्तीबेटावर तिरंगा फडकावून वंदे मातरम्, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा देत आपला मुक्काम रामघाटच्या डोंगरात हलविला. सरदार पटेलांच्या भूमिकेमुळे निजामाचे राज्य लयास आले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हा प्रांत भारतीय संघ राज्यात विलीन झाला. भारतीय स्वातंत्र्याचा लढा व हैदराबाद मुक्तीचा लढा यांच्यातील साधर्म्य सारखेच आहे.