शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

सरकारचा ‘विकास’ विजय मल्ल्यासारखा पळून गेला का ? अजित पवारांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 9:27 PM

विकासाच्या नावाने सत्तेत आलेल्या सरकारचा विकास हरवला असून तो विजय मल्ल्यासारखा पळून गेला का असा सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला उदगीरच्या जाहीर  सभेत केला.

लातूर ( उदगीर ) : विकासाच्या नावाने सत्तेत आलेल्या सरकारचा विकास हरवला असून तो विजय मल्ल्यासारखा पळून गेला का असा सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला उदगीरच्या जाहीर  सभेत केला.

लातूर जिल्हयातील दुसरी सभा उदगीरमध्ये मोठया उत्साहामध्ये पार पडली. सभेच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करुन सुरु करण्यात आला. या मोर्चात विधीमंडळ पक्षनेते अजित पवार सहभागी झाले होते. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आणि भव्य जाहीर सभा पार पडली. 

या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,विधानपरिषदेचे विरोधी पक्षते धनंजय मुंडे,आमदार राणा जगजितसिंह पाटील,आमदार विक्रम काळे,आमदार सतिष चव्हाण,आमदार जयदेव गायकवाड,प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील,उदगीर तालुकाध्यक्ष शिवाजी मुळे,शहराध्यक्ष समर शेख,युवक शहराध्यक्ष चंदन पाटील नागराळकर,विधानसभा अध्यक्ष प्रविण भोळे आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

व्यवहारी दृष्टीकोन न ठेवता सरकारने मुठभर लोकांसाठी नोटबंदी आणि कॅशलेससारखी योजना राबवली. या योजनेचा फायदा न होता माझ्या ग्रामीण भागातील लोकांना त्याचा फटका जास्त बसला.राज्यात नवीन गुंतवणूक नाही,नोकऱ्या नाहीत,फक्त साडेतीन वर्षात सरकार खड्डे बुजवत बसली आहे.सगळ्या योजना सरकारच्या अशापध्दतीच्या आहेत. नुसती बनवाबनवी,गाजर दाखवण्याचे,फेकूगिरी करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.मागच्यावेळी बटन दाबून केलेली चूक पुन्हा उदगीरकरांनो करु नका असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.

सभेमध्ये विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले. त्यांनी या सरकारला पुन्हा एकदा संपावर पाठवण्याची वेळ आली असून त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे हल्लाबोल आंदोलन केले आहे. जमीन विकून मिळवलेला पैसा आणि पावडर खावून बनवलेली बॉडी आणि मोदी लाटेत निवडून आलेले लोक कधीच पुन्हा येत नाहीत असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला. या सभेमध्ये आमदार जयदेव गायकवाड,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,संजय बनसोडे,बसवराज नागराळकर यांनीही सरकारवर हल्लाबोल केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारlaturलातूर