तणावामुळे घरात कोसळलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 18:47 IST2021-11-20T18:13:54+5:302021-11-20T18:47:37+5:30
Death of an ST employee :शिवकुमार भानुदास शिरापुरे (३८, रा. देवणी) असे मयत एसटी कर्मचा-याचे नाव आहे.

तणावामुळे घरात कोसळलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
देवणी (जि. लातूर) : आंदोलनामुळे मानसिक तणावात असलेला येथील एक एसटी कर्मचारी दहा दिवसांपूर्वी घरात कोसळून पडला होता. त्यामुळे त्याच्यावर लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान शनिवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
शिवकुमार भानुदास शिरापुरे (३८, रा. देवणी) असे मयत एसटी कर्मचा-याचे नाव आहे. शिवकुमार शिरापुरे हे निलंगा येथील बस आगारात यांत्रिकी विभागात कार्यरत होते. सध्या एसटी कर्मचा-यांचा संप सुरु असल्याने ते चिंताग्रस्त होते. संभाव्य आर्थिक अडचणींमुळे ते मानसिक तणावात होते. दरम्यान, १० दिवसांपूर्वी घरात अचानकपणे कोसळल्याने त्यांच्या डोक्यास जबर मार लागला होता. त्यांच्यावर लातुरील खाजगी दवाखान्यात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान शनिवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर देवणी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.