डोंगरशेळकीतील नुकसानग्रस्त शेती, पिकांची केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:19 IST2021-07-26T04:19:41+5:302021-07-26T04:19:41+5:30
डोंगरशेळकी येथील पाझर तलाव शनिवारी फुटून भारतसिंग ठाकूर यांच्या शेताचे संपूर्ण नुकसान झाले, तसेच देवीदास मुंडे, पांडुरंग पुंड, मुरलीधर ...

डोंगरशेळकीतील नुकसानग्रस्त शेती, पिकांची केली पाहणी
डोंगरशेळकी येथील पाझर तलाव शनिवारी फुटून भारतसिंग ठाकूर यांच्या शेताचे संपूर्ण नुकसान झाले, तसेच देवीदास मुंडे, पांडुरंग पुंड, मुरलीधर पुंड, राम बिजराळे, विश्वांभर मुंडे आदी शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाहून गेली आहेत. या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत करण्यात येईल, असे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, सरपंच नागरबाई कांबळे, उपसरपंच गणपत पवार, संजय पाटील, माजी सरपंच ज्ञानोबा मुंडे, मारुती मुंडे, गणपत पवार, बी.एन. मुंडे, मनोज मुंडे, अविनाश बरुरे, तातेराव मुंढे, नरसिंग मुंडे, तलाठी दत्तात्रय मोरे, कृषी सहायक सुरेखा सुरवसे, विमा प्रतिनिधी पाटील, शेतकरी भारतसिंग ठाकूर, पांडुरंग पुंड, बाबूराव राठोड आदींची उपस्थिती होती.