शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

लातूर मनपाकडून दैनंदिन १८ दशलक्ष लिटर पाण्याची बचत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 6:35 PM

भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता काटकसरीचा हा प्रयोग मनपाने गेल्या महिनाभरापासून सुरू ठेवला आहे.

ठळक मुद्देपाण्याची मागणी ६८ मनपा पुरवठा करते ५० द.ल.ली.३० टक्के अपव्यय रोखण्याचाही प्रयत्न

- हणमंत गायकवाड

लातूर  : व्यावसायिक व इतर मागणी तसेच योजनेतील तूट गृहित धरता १०० लिटर दरडोई प्रमाणे ६८ द.ल.ली. पाण्याची शहराला गरज आहे. त्यानुसार ६८ दलली.ची मागणी असली, तरी प्रत्यक्षात ५० दलली. पाणी मांजरा प्रकल्पातून लातूर शहराला उचलले जाते. साधारणपणे १८ द.ल.ली. पाणी कमी उचलून बचत केली जात आहे. भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता काटकसरीचा हा प्रयोग मनपाने गेल्या महिनाभरापासून सुरू ठेवला आहे. या सूत्रानुसार जून अखेर पाणी पुरेल, असा विश्वास मनपा प्रशासनाला आहे.

नागरिकांकडून अंदाज ३० टक्के पाण्याचा अपव्यय होतो. ११.५० द.ल.ली. अपव्यय आहे. तो टाळण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मांजरा प्रकल्पात सध्या ३१.७० दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा आहे. या पाणी साठ्याचा वापर काटकसरीने मनपाने सुरू केला आहे. १८ दशलक्ष लिटर पाण्याची बचत दररोज केली जात आहे. मागणी ६८ दशलक्ष लिटरची असताना ५० दशलक्ष लिटर पाणी दररोज उचलले जात आहे. पाणी गळतीवरही मनपाचा कटाक्ष असून, ११.५० दशलक्ष लिटर दररोजचा होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मनपाने पावले उचलली आहेत.

धनेगाव ते हरंगुळ दरम्यानच्या ५० कि.मी. लांबीच्या गुरुत्ववाहिनीवरील गळत्या, अनधिकृत नळ बंद करण्यात येत आहेत. जलशुद्धीकरण केंद्राच्या बॅकवॉशचे वाया जाणाऱ्या ८ ते १० लाख लिटर पाण्याची बचत केली जात आहे. वितरण व्यवस्थेच्या पाईपलाईनवरील गळत्या बंद करुन अमृत योजने अंतर्गत जलकुंभाची व्हॉल्वही बदलण्यात आली आहे. 

२० दशलक्ष लिटर पाणी बचतीचा प्रयत्न... शहराची लोकसंख्या ५ लाख आहे. या लोकसंख्येला दरडोई १०० लिटर पाण्याची गरज लक्षात घेता मागणी ६८ दशलक्ष लिटर आहे. परंतु, लातूर मनपाने मागणीमध्ये १८ दशलक्ष लिटरची बचत, अपव्यय टाळून ५ दशलक्ष लिटर वापरासाठी पाणी उपयोगात आणणे, कॅशबॅकमधून ८ ते १० लाख लिटर पाण्याची बचत केली जात आहे. तथापि, ५० पेक्षा कमी ४८ दशलक्ष लिटर पाण्यावर ५ लाख लोकसंख्येच्या शहराची तहान भागविण्याचा प्रयत्न सध्या प्रशासनाकडून केला जात आहे. या उपाययोजनेमुळे सात दिवसांआड शहराला पाणी पुरवठा करणे प्रशासनाला शक्य होत आहे. 

नळांना मीटर बसविण्याची निविदा अंतिम टप्प्यात... लातूर शहरातील सर्व नळांना वॉटर मीटर बसविण्यासाठी महानगरपालिकेने निविदा मागविल्या होत्या. त्यातील निविदा मान्यतेसाठी अंतिम टप्प्यात आहे. शिवाय, जलमापक खाजगी पुरवठादाराकडून बसवून घेण्याचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. मनपाच्या या उपाययोजनेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा प्रशासनाची आहे. 

 

टॅग्स :WaterपाणीMuncipal Corporationनगर पालिकाdroughtदुष्काळ