देवणीतील ९ व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:20 IST2021-05-09T04:20:29+5:302021-05-09T04:20:29+5:30

ब्रेक द चेन अंतर्गत किराणा, भाजीपाला, दूध, बेकरी आदी अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ वा.पर्यंत सुरू ठेवण्याचे ...

Crime filed against 9 traders in Devani | देवणीतील ९ व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

देवणीतील ९ व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

ब्रेक द चेन अंतर्गत किराणा, भाजीपाला, दूध, बेकरी आदी अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ वा.पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश होते. मंगळवारी येथील पोलीस निरीक्षक सी. एस. कामठेवाड यांनी येथील बाजारपेठेत पाहणी केली असता काही व्यापारी निर्धारित वेळेनंतरही आपली दुकाने सुरू ठेवल्याचे तसेच दुकानात गर्दी केल्याचे, मास्क न वापरल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर देवणी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार विनायक कांबळे, नरेश उस्तुर्गे, लक्ष्मण नागरगोजे, सतीश पवार, बालाजी शिंदे, व्यंकटराव नळगिरे यांच्या फिर्यादीवरून येथील ९ व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सी. एस. कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, शनिवारपासून मेडिकल, दवाखाने वगळता अन्य कुठल्याही सेवा सुरू राहणार नाहीत. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Web Title: Crime filed against 9 traders in Devani