५-१० टक्के व्याजाचा फास अन् गुंडांकडून धमक्या! उदगीरमध्ये तीन सावकारांच्या घरावर छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 11:54 IST2026-02-28T11:53:49+5:302026-02-28T11:54:32+5:30

तिघा सावकारांच्या घरातून कोरे धनादेश अन् बॉण्ड जप्त करण्यात आले, कारवाईने खळबळ

Crackdown on Illegal Moneylending in Udgir: Raid at 3 Locations; Blank Cheques and Bond Papers Seized | ५-१० टक्के व्याजाचा फास अन् गुंडांकडून धमक्या! उदगीरमध्ये तीन सावकारांच्या घरावर छापे

५-१० टक्के व्याजाचा फास अन् गुंडांकडून धमक्या! उदगीरमध्ये तीन सावकारांच्या घरावर छापे

उदगीर (जि. लातूर) : शहरासह परिसरात अवैध सावकारीने धुमाकूळ घातला असून, गरिबांसह छोटे व्यावसायिक सावकारीच्या पाशात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका व्यापाऱ्याने सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर, सहकार विभागाने मोठी कारवाई करत उदगीर शहरातील तिघा संशयित ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले आहेत.

प्राप्त झालेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार आणि उदगीरचे सहाय्यक उपनिबंधक बी.एस. नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष पथके तयार करण्यात आली होती. दरम्यान, या पथकांनी शुक्रवारी सकाळी उदगीर शहरातील विविध भागांत शोधमोहीम राबवली. रवीप्रभा गणपत मोतेवाड व गणपत मोतेवाड यांच्या घराची झडती घेतली असता अवैध सावकारीशी संबंधित अनेक संशयास्पद कागदपत्रे हाती लागली आहेत. काशिनाथ विश्वनाथ सोमवंशी, निडेबन यांच्याकडेही अवैध व्यवहारांची कागदपत्रे सापडली आहेत. तर येनकी-मानकी राेडवरील पिराजी बाबुराव बालूरे यांच्या घरीही पथकाने कसून तपासणी केली. या कारवाईत अहमदपूर, जळकोट, औसा, निलंगा आणि लातूर येथील सहकार अधिकारी तसेच शहर व ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले होते.

पथकाचा छापा; काय केले जप्त?
सहकार विभागाच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात कोरे धनादेश, सह्या केलेले कोरे स्टॅम्प पेपर आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ही सर्व कागदपत्रे जप्त करून त्यांचा रितसर पंचनामा करण्यात आला.

पाच ते दहा टक्के व्याजाचे आहे चक्र...
उदगीर शहरात ५ ते १० टक्के व्याजाच्या चक्रात अडकलेल्या नागरिकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे समोर आले. अनेकदा व्याजाच्या मोबदल्यात गुंडांकरवी धमकावत कर्जदारांचे सोने अथवा स्थावर मालमत्ता बळकावली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

नागरिकांनी तक्रार करावी...
‘कोणत्याही नागरिकाचे अवैध सावकारीतून शोषण होत असेल, जबरदस्तीने वसुली केली जात असेल किंवा मालमत्ता जप्त करण्याची धमकी दिली जात असेल, तर त्यांनी न घाबरता सहकार विभागाकडे तक्रार करावी.’ - बी. एस. नांदापूरकर, सहाय्यक उपनिबंधक

Web Title : उदगीर में सूदखोरों पर छापा, 5-10% ब्याज और धमकी का खुलासा।

Web Summary : उदगीर में अवैध सूदखोरी के बाद तीन स्थानों पर छापे मारे गए। दस्तावेजों, कोरे चेक, स्टाम्प पेपर जब्त। पीड़ितों को ऊंची ब्याज दरें और धमकी का सामना करना पड़ा। अधिकारियों ने शोषण की रिपोर्ट करने का आग्रह किया।

Web Title : Usury crackdown: Raids expose loan sharks threatening Udgir residents.

Web Summary : Udgir authorities raided three loan sharks after a suicide linked to usury. Documents, blank checks, and stamped papers were seized. Victims faced high interest rates and threats. Officials urge reporting exploitation.