coronavirus: ९१ वर्षीय माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 12:51 IST2020-07-16T12:44:45+5:302020-07-16T12:51:45+5:30

राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे गुरूवारी दुपारी अधिकृतपणे सांगण्यात आले.

coronavirus: Former Chief Minister of the state, former Chief Minister Dr. Nilangekar Corona Positive | coronavirus: ९१ वर्षीय माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह

coronavirus: ९१ वर्षीय माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह

लातूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे गुरूवारी दुपारी अधिकृतपणे सांगण्यात आले. ९१ वर्षीय डॉ. निलंगेकर हे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना कफ वगळता कोरोनाची इतर लक्षणे नव्हती. दरम्यान त्यांची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.

वय, मधुमेह लक्षात घेता अधिक काळजी घेतली जात आहे. यासंदर्भात त्यांचे नातू माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले, प्रकृती स्थिर आहे. १४ जुलैला ताप आला होता, त्यानंतर निलंगा येथून त्यांना लातूरला आणले. तिथे त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. मला खात्री आहे ते कोरोनावर मात करून आपल्याशी संवाद साधतील, असेही ते म्हणाले.  पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्याचा विचार सुरू आहे.

Web Title: coronavirus: Former Chief Minister of the state, former Chief Minister Dr. Nilangekar Corona Positive