CoronaVirus : मृतदेहांची अदलाबदल! अंत्यसंस्कारानंतर जेसीबीच्या सहाय्यानं पुन्हा बाहेर काढावं लागलं पार्थिव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 21:19 IST2021-05-06T21:13:36+5:302021-05-06T21:19:55+5:30
एकाच मृतदेहावर दोनवेळा अंत्यसंस्कार! ...मग चव्हाण यांच्या नातेवाईकांनी त्यांचे पार्थिव आपल्या गावी नेले.

CoronaVirus : मृतदेहांची अदलाबदल! अंत्यसंस्कारानंतर जेसीबीच्या सहाय्यानं पुन्हा बाहेर काढावं लागलं पार्थिव
लातूर- मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे समजल्यानंतर अंत्यसंस्कार झालेले पार्थिव पुन्हा जमिनीतून बाहेर काढण्यात आले आणि ते संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकारामुळे एकाच पार्थिवावर दोन वेळा अंत्यसंस्कार करावे लागले. ही घटना गुरुवारी येथे घडली. (CoronaVirus exchange of corpses; After the funeral, JCB had to take dead body out)
जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात असलेल्या शेळगाव येथील धोंडिराम सदाशिव तोंडारे (६५) हे आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी उदगीर येथे नेण्यात आले होते. तेथून त्यांना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. दरम्यान, बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. याचदरम्यान अंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथील आबासाहेब सखाराम चव्हाण (४५) यांचाही मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव तोंडारे यांचे समजून शेळगाव येथे आणण्यात आले होते आणि त्यांच्यावर विधीवत अंत्यसंस्कारही झाले. तर चव्हाण म्हणून तोंडारे यांचे पार्थिव अंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथे नेण्यात आले. हातोल्यातील नातेवाईकांना संबंधित मृतदेह आपल्या नातेवाईकाचा नाही, असे लक्षात आल्यानंतर, त्यांनी तो ताब्यात घेण्यास नकार दिला. यानंतर आरोग्य यंत्रणेची पळापळ उडाली.
CoronaVirus : भारतात खतरनाक झालाय कोरोनाचा डबल म्यूटेंट, सरकारनं सांगितलं...
अखेर शेळगाव येथील धोंडिराम तोंडारे यांचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयातून शेळगाव येथे आणण्यात आला. त्यांच्यासोबत चव्हाण यांचे नातेवाईकही शेळगावला पोहोचले. तिथे अंत्यविधी करण्यात आलेला चव्हाण यांचा मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला. यानंतर चव्हाण यांच्या नातेवाईकांनी त्यांचे पार्थिव आपल्या गावी नेले.
नातेवाईकांनी चुकून नेला मृतदेह -
धोंडिराम सदाशिव तोंडारे व आबासाहेब सखाराम चव्हाण या दोघांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होते. पहिल्यांदा तिथे आलेल्या तोंडारे यांच्या नातेवाईकांनी चुकून आबासाहेब चव्हाण यांचे पार्थिव नेले. ही बाब त्यांच्या मुलांनी लेखी दिली आहे. दरम्यान, आबासाहेब चव्हाण यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केला, असे येथील अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी म्हटले आहे.
CoronaVirus: कोरोनावर मात करण्यासाठी गाईचं दूध बनलंय चिनी लोकांचं 'हत्यार'!