CoronaVirus : भारतात खतरनाक झालाय कोरोनाचा डबल म्यूटेंट, सरकारनं सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 03:30 PM2021-05-06T15:30:42+5:302021-05-06T15:51:06+5:30

काही दिवसांपूर्वी WHOने म्हटले होते, की डबल म्यूटेंट व्हेरिएंट सर्वप्रथम भारतातच आढळून आला होता. मात्र आता, हा व्हेरिएंट किमान 17 देशांत पसरला आहे.

भारतात कोरोना महारामारीने आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. दिवसेंदिरवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी UK व्हेरिएंट आणि काही प्रमाणावर डबल म्यूटेंटला जबाबदार धरले जात होते. यातही UK व्हेरिएंट अधिक संक्रमक असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता सरकारने म्हटले आहे, की भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील आपत्तीला डबल म्यूटेंटच जबाबदार असू शकतो. (Corona Virus double mutant infecting more than uk variant now)

सरकारने म्हटले आहे, की UK व्हेरिएंट फार अधिक संक्रमक आणि कोरोनाची अधिक गंभीर लक्षणे निर्माण करण्यासाठी ओळखला जातो. मात्र, आता संपूर्ण देशात या व्हेरिएंटच्या प्रकरणांत कमी दिसून येत आहे.

UK व्हेरिएंटमुळे संक्रमित होणाऱ्या लोकांची संख्येत कमी आहे. मात्र, भारतातील डबल म्यूटेंट व्हेरिएंट B.1.617 मुळे संक्रमित होणारांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सर्वात पहिले हा व्हेरिएंट महाराष्ट्रात आढळला होता.

नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे डायरेक्टर सुजीत सिंह यांनी म्हटले आहे, की गेल्या एक-दीड महिन्यात वेगाने वाढलेल्या कोरोना रुग्ण संख्येला डबल म्यूटेंट व्हेरिएंटच जबाबदार असू शकतो. काही दिवसांपूर्वी WHOने म्हटले होते, की डबल म्यूटेंट व्हेरिएंट सर्वप्रथम भारतातच आढळून आला होता. मात्र आता, हा व्हेरिएंट किमान 17 देशांत पसरला आहे.

सिंह म्हणाले, 'UK व्हेरिएंट B117, SARS-CoV2 शी संबंधित आहे. यामुळे दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली होती. मात्र, आता या व्हेरिएंटच्या रुग्ण संख्येत कमी येत आहे. महाराष्ट्र आणि इतरही काही राज्यांत आता B.1.617 चे रुग्ण अधिक प्रमाणावर आढळून येत आहेत.'

सिंह म्हणाले, 'गेल्या दीड महिन्यांत काही राज्यांत कोरोना रुग्ण संख्येतील वाढ आणि आणि B.1.617 मध्ये संबंध दिसून आला आहे.' मात्र, त्यांनी असेही म्हटले आहे, की अद्याप रोगशास्त्र आणि क्लिनिकली B.1.617 आणि कोरोनाचे वाढते रुग्ण, यांच्यातील संबंध पूर्णपणे प्रस्थापित होऊ शकलेला नाही.

भारतात यूके, ब्राझील आणि दक्षिण अफ्रिकेचे व्हिरिएंट आढळून आले आहेत आणि त्यांना सरकारने 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' च्या श्रेणीत टाकले आहे. अर्थात हे व्हेरिएंट चिंतेचा विषय आहेत.

भारतात 13,000 सॅम्पल तपासण्यात आले आहेत. यांपैकी 3532 सॅम्पल्स व्हेरिएंट ऑफ कंसर्नचे आहेत. तर 1527 सॅम्पल्स लोकल व्हेरिएंट B.1.617 चे आढळून आले आहेत. यातील अधिकांश महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, दिल्ली, गुजरात, छत्तीसगड, झारखंड आणि मध्य प्रदेशच्या भागातून एकत्रित करण्यात आलेल्या सॅम्पल्समध्ये आढळून आले आहेत.

तज्ज्ञांच्या मते, B.1.617 व्हेरिएंटचे देन्ही म्यूटेशन E484Q आणि L425R व्हायरसच्या स्पाइक प्रोटीन भागात आहेत.स्पाइक प्रोटीन हा कोरोना व्हायरसचा बाहेरील भाग आहे. ज्याच्या माध्यमाने व्हायरस मानवी शरीराच्या पेशींत दाखल होतो. विशेष म्हणजे, हे दोन्ही स्पाइक म्यूटेशन इम्यूनिटीलाही चकवा देण्यात सक्षम आहेत. त्यामुळेच हे अधिक संक्रमक असल्याचे बोलले जात आहे.

बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सचीव रेणू स्वरूप यांनी म्हटले आहे, की भारतात एप्रिल 2020 मध्ये जीनोम सर्व्हिलान्स आणि सिक्वेंसिंगची सुरुवात झाली होती. मात्र, जेव्हा पुरेशा डेटात सर्व्हिलान्स आणि रोगशास्त्राशी संबंधित प्रमाण आढळतात, तेव्हा चिंतेचा विषय असतो. ते म्हणाले, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात राज्य नियमितपणे व्हेरिएंटशी संबंधित रिपोर्ट पाठवत होते. ज्याचा अभ्यास केला जात होता.

स्वरूप म्हणाले, हा व्हेरिएंट अधिक खतरनाक आहे, की हे व्हायरसचे केवळ रुटीन व्हेरिएंट आहे, यासंदर्भात अद्याप पुरेसा डेटा मिळालेला नाही.

आंध्र प्रदेशात नुकताच कोरोनाचा आणखी एक व्हेरिएंट N440K आढळून आला आहे. तो 15 पट अधिक संक्रमक असल्याचे बोलले जात आहे.