coronavirus : लातूर शहरातील १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 22:58 IST2020-05-29T22:54:00+5:302020-05-29T22:58:08+5:30
मोतीनगर येथील बाधिताच्या संपर्कातील ९ नागरिक

coronavirus : लातूर शहरातील १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
लातूर : लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून, शुक्रवारी रात्री १०.३० वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात आणखीन १० पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत.
यातील ९ रूग्ण गुरूवारी मोतीनगर येथे आढळलेल्या एका बाधित रूग्णाच्या कुटुंबातील सदस्य आहेत. तर अन्य एक रूग्ण देसाई नगरातील आहे़ आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांचा आलेख १२९ वर पोहोचला आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शुक्रवारी एकूण ५० व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३८ निगेटिव्ह आले असून, १० पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दोन व्यक्तींचे अहवाल अनिर्णीत ठेवले असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर व प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.