लातूर-नांदेड मार्गावर कार अन् ट्रकचा अपघात, कारचे नुकसान

By राजकुमार जोंधळे | Updated: September 21, 2022 16:50 IST2022-09-21T16:49:51+5:302022-09-21T16:50:40+5:30

अपघातामुळे काही वेळ झाली वाहतूक कोंडी

Car and truck accident on Latur-Nanded road, damage to car | लातूर-नांदेड मार्गावर कार अन् ट्रकचा अपघात, कारचे नुकसान

लातूर-नांदेड मार्गावर कार अन् ट्रकचा अपघात, कारचे नुकसान

लातूर: जिल्ह्यातील लातूर ते नांदेड महामार्गावरील भातखेड पुलानजीक कार आणि ट्रकचा अपघात झाल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. यात कारचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अपघाताने या मार्गावरील वाहतूक काहीवेळ खोळंबली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत ती सुरळीत केली. याबाबत लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अद्याप नोंद करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी सांगितले,  लातूरकडून नांदेडच्या दिशेने बुधवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास कार निघाली होती. दरम्यान, समोर एक मालवाहतूक ट्रक धावत होता. कार  आणि ट्रकचा लातूर तालुक्यातील भातखेडा येथील मांजरा नदीवरील पुलानजीक अपघात झाला. या अपघातात किरकोळ जखमी झाले आहे. तर कारचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस कर्मचारी तातडीने दाखल होवून पाहणी केली. अशी माहिती लातूर ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी दिली.

Web Title: Car and truck accident on Latur-Nanded road, damage to car