अहमदपूर येथे पेट्रोल पंपावर रॉडने मारहाण; १० ते १२ जणांविराेधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 04:31 IST2026-03-28T04:31:28+5:302026-03-28T04:31:28+5:30

अहमदपूर पोलिसांनी दहा ते बारा जणांविराेधात गुन्हा दाखल केला.

beaten with rod at petrol pump in ahmedpur case registered against 10 to 12 people | अहमदपूर येथे पेट्रोल पंपावर रॉडने मारहाण; १० ते १२ जणांविराेधात गुन्हा दाखल

अहमदपूर येथे पेट्रोल पंपावर रॉडने मारहाण; १० ते १२ जणांविराेधात गुन्हा दाखल

राजकुमार जाेंधळे, अहमदपूर (जि. लातूर) : येथील नांदेड रोडवरील श्री साई पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल देण्याच्या कारणावरून वाद घालून, एका २० वर्षीय तरुणाला रॉडने जबर मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात १० ते १२ जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी रितेश रोहीदास गोरले (वय २०, रा. हागदळ) हा मजुरी काम करतो. २६ मार्च रोजी ताे रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंपावर असताना, मधुकर धडे याने ‘बाटलीत पेट्रोल का देत नाहीस?’ असे म्हणून वाद घातला. यावेळी आरोपीने फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मधुकर धडे यांच्या मोठ्या व लहान मुलाने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेले माउली केंद्रे, यतीराज केंद्रे यांनाही आरोपींनी सोडले नाही. मधुकर धडे याने लोखंडी रॉडने यतीराज केंद्रे यांच्या डोक्यात प्रहार केला. तर माउली केंद्रे यांच्या हातावर वार केले. काही वेळाने रवी कचवे हा ८ ते १० मुलांसह पंपावर आला. त्यांनी फिर्यादी व मदन केंद्रे यांना मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत फिर्यादी रितेश गोरले याच्या तक्रारीवरून अहमदपूर पोलिसांनी दहा ते बारा जणांविराेधात गुन्हा दाखल केला. तपास डीवायएसपी अरविंद रायबोले करत आहेत.

Web Title : अहमदपुर: पेट्रोल पंप पर मारपीट; 10-12 लोगों के खिलाफ मामला दर्ज।

Web Summary : अहमदपुर के एक पेट्रोल पंप पर बोतल में पेट्रोल देने को लेकर विवाद मारपीट में बदल गया। एक 20 वर्षीय युवक को रॉड से पीटा गया। पुलिस ने अत्याचार अधिनियम के तहत 10-12 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया।

Web Title : Ahmedpur: Petrol pump brawl; Case filed against 10-12 individuals.

Web Summary : Argument over petrol in a bottle at an Ahmedpur pump escalated into assault. A 20-year-old was beaten with rods. Police filed a case, including charges under the Atrocity Act, against 10-12 people following the incident.