ऑटाेचालकाच्या खुनाचा उलगडा; दाेघे पोलिसांचा जाळ्यात!
By राजकुमार जोंधळे | Updated: October 11, 2023 18:56 IST2023-10-11T18:55:42+5:302023-10-11T18:56:23+5:30
या खुनाचा उलगडा औसा पाेलिसांनी केला असून, दाेघांना लातुरातून अटक केली आहे.

ऑटाेचालकाच्या खुनाचा उलगडा; दाेघे पोलिसांचा जाळ्यात!
लातूर : ऑटाेचालकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना दाेन दिवसांपूर्वी लातूर औसा महामार्गावरील खडी केंद्र परिसरात घडली. या खुनाचा उलगडा औसा पाेलिसांनी केला असून, दाेघांना लातुरातून अटक केली आहे.
लातूर-औसा महामार्गावरील एका खडी केंद्रानजीक ७ ते ८ ऑक्टोबरच्या रात्री अज्ञातांनी ऑटाेचालक इस्माईल मुबारक मणियार (वय ४१, रा. हरंगुळ बु. ता. लातूर) यांचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली हाेती. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला हाेता. खुनाचा उलगडा करून, आरोपींना अटक करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सूचना केल्या. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, औसा डीवायएसपी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली औसा ठाण्याचे पो.नि. सुनील रेजितवाड, स्थागुशाचे पो.नि. संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली पथके नियुक्त केली. अशपाक युसुफ शेख (वय २८, रा. हमाल गल्ली, लातूर), जाकीर अब्दुल गफार शेख (वय ३०, रा. खाडगाव रोड, लातूर) यांनीच हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. खुनानंतर आरोपी हे काहीही घडले नाही, असा बनाव करत दोन दिवसांपासून वावरत होते. दरम्यान, खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून दाेघांना हिसका दाखवत चाैकशी केली असता, त्यांनी कबुली दिली.
ही कारवाई सपाेनि. भोळ, प्रवीण राठोड, संजू भोसले, सुधीर कोळसूरे, सिद्धेश्वर जाधव, राजेश कंचे, योगेश गायकवाड, रियाज सौदागर, नकुल पाटील, ‘सायबर’चे पोनि. अशोक बेले, गणेश साठे, शैलेश सुडे, रामकिशन गुट्टे, मुबाज सय्यद, प्रल्हाद शिरमवाड, महारुद्र डिगे, शिवरुद्र वाडकर, मोतीराम घुले, तुकाराम माने, बालाजी चव्हाण, भरत भुरे, गोविंद पाटील, नवनाथ चामे, मदार बोपले, सचिन मंदाडे, भागवत गोमारे, दंतुरे, पांचाळ यांच्या पथकाने केली.