लातुरात एका तरुणावर कत्ती, राॅड, पाईने हल्ला !

By राजकुमार जोंधळे | Updated: September 26, 2022 05:13 IST2022-09-26T05:13:12+5:302022-09-26T05:13:48+5:30

पाच जणांविराेधात गुन्हा

Attack on a young man in Latur with knife rod pipe crime news | लातुरात एका तरुणावर कत्ती, राॅड, पाईने हल्ला !

लातुरात एका तरुणावर कत्ती, राॅड, पाईने हल्ला !

लातूर : मागील भांडणाची कुरापत काढून एका तरुणावर पाच जणांनी लाेखंडी कत्ती, राॅड आणि पाईपने हल्ला केल्याची घटना लातुरातील बाभळगाव राेड येथे घडली. याबाबत विवेकांनद चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शरद राजेंद्र माेरे (वय ३३ रा. भाडगाव ता. लातूर) यांना बाभळगाव राेड येथे २२ सप्टेंबर राेजी मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करत उमेश कदम याच्यासह अन्य चार जणांनी संगणमत करुन लाेखंडी कत्ती, राॅड, पाईपने डाेक्यात डाव्या बाजूला, डाव्या हातावर, डाव्या पायावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. फिर्यादीवर लातुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर फिर्यादीसाेबत असलेल्या एका साक्षीदारालाही मारहाण केली. असे तक्रारीत म्हटले आहे. 

याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन चार जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक बुड्डे करत आहेत.

Web Title: Attack on a young man in Latur with knife rod pipe crime news