सीआयडी असल्याची बतावणीकरुन एका वृद्धाला लुबाडले 

By राजकुमार जोंधळे | Updated: December 27, 2022 19:02 IST2022-12-27T19:00:48+5:302022-12-27T19:02:05+5:30

लातुरातील घटना : दिशाभूल करत अंगठी पळवली

An old man was robbed by pretending to be a CID officer | सीआयडी असल्याची बतावणीकरुन एका वृद्धाला लुबाडले 

सीआयडी असल्याची बतावणीकरुन एका वृद्धाला लुबाडले 

लातूर : आम्ही पाेलीस आहाेत, अशी बतावणी करुन एका ७२ वर्षीय वृद्धाला अज्ञातांनी गंडविल्याची घटना लातुरातील साळे गल्ली येथे २६ डिसेंबर राेजी घडली. याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी अशाेक रामराव सातपुते (वय ७२, रा. लातूर) यांना विनाक्रमांकाच्या माेटारसायकलवरुन आलेल्या दाेघांनी संगणमत करुन साळे गल्लीत अडविले. दरम्यान, आपण पाेलीस आहाेत, अशी बतावणी करुन, तुम्ही मास्क का लावला नाही? आम्ही स्पेशल ब्रॅचचे सीआयडीचे पाेलीस आहाेत. तुमच्या खिशात गांजा, आफिम आहे का? अशी विचारणा करुन फिर्यादीला खिशातील सर्व साहित्य बाहेर काढा असे म्हणून, काढायला लावले. फिर्यादीच्या हातातील पाच ग्रॅमची साेन्याची अंगठी रुमालामध्ये बांधायला लावली. ताे रुमाल फिर्यादीला परत दिला. फिर्यादीने रुमाल उघडून पाहिले असता, त्यातील साेन्याची अंगठी नक्कल त्यांनी काढून घेतली. अज्ञातांनी दिशाभूल करत वृद्धाला लुबाडले.

याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात अज्ञाताविराेधात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलीस उपनिरीक्षक साेनकांबळे करत आहेत.

Web Title: An old man was robbed by pretending to be a CID officer