शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
4
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
5
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
6
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
7
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
8
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
9
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
10
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
11
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
12
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
13
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
14
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
15
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
16
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
17
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
18
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
19
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
20
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

पंचांगकर्त्यांचा मोठा अंदाज; यंदा पाऊसमान सरासरी गाठेल, मात्र...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 1:47 PM

मनुष्याच्या निसर्गचक्राशी विसंगत वागणूकीने ग्रहस्थितीनुसार पर्जन्ययोग असूनही प्रत्यक्षात पाण्याची नक्षत्रे कोरडी जात असल्याचे मत पंचांगकर्त्यांनी नोंदवले आहे

- व्ही. एस. कुलकर्णीउदगीर: यंदा पाऊस नेहमीपेक्षा उशिरा सुरू होईल, काही भागांत पावसाचा जोर राहील तर काही भागांत कमी राहील. पाऊसमान सरासरी गाठेल, मात्र पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागेल. पडलेल्या पावसाचे पुनर्भरण करावे लागेल.यासाठी सरकारी नियोजन कमी पडणार असल्याचा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तवला आहे.

यंदा रोहिणी, मृग नक्षत्रात वारे व वादळ होवून पावसाचे आगमन होईल. नियमित पाऊस २० जून नंतर सुरू होईल.आर्द्रा नक्षत्रात थोडा फार पाऊस होईल. मघा, पूर्वा, उत्तरा, ही नक्षत्रे चांगली वृष्टीकारक असून, हस्त नक्षत्राचे पूर्वार्धात चांगली वृष्टी होईल. पावसाचे मान हे नेहमीच लहरी व खंडवृष्टीकारक झाले आहे. त्यामुळे जेवढा पाऊस पडतो , त्या पाण्याची साठवणूक , पाणी जिरवण्याची योग्य व्यवस्था  याद्वारे पाण्याचे नियोजन जनतेने अवश्य करावे ही काळाची गरज आहे. बेसुमार वृक्षतोड, वाढलेले तापमान, निसर्गचक्राशी विसंगत वागणूक यामुळे ग्रहस्थितीनुसार पर्जन्ययोग असूनही प्रत्यक्षात पाण्याची नक्षत्रे कोरडी जात असल्याचा अनुभव  पहायला मिळत आहे. तर कांही वेळा अनपेक्षितपणे अतिवृष्टी होवून  शेतीचे नुकसान होत असल्याचा अंदाज एका पंचांगकर्त्यांनी वर्तवला आहे.

३ वर्षांत ५०० मिमी पेक्षा कमी पाऊस१९८६, १९९२, १९९४ सालीही उदगीर तालुक्यात ५०० मि. मी. पेक्षा कमी पाऊस झाला होता. या कालावधीत पर्यावरणाचा विनाश कमी असल्यामुळे लोकांना पिण्याचे पाणी मिळत होते. अन्नधान्याचा तुटवडा व रोजगारासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. आजघडीला ही परिस्थिती बदलली आहे. अन्नधान्याचा मुबलक साठा असला तरी एक दोन वर्षे झाली की, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावीच लागते. त्यामुळे पडलेल्या पावसाचे नियोजन करून पुनर्भरण करणे काळाची गरज असल्यामुळे हे बंधनकारक करण्याची वेळ आता आली आहे. हे अंदाजही वेगवेगळ्या पंचांगकर्त्यांनी वर्तवले आहेत.

पुनर्भरण बंधनकारक असावेउदगीर तालुक्यात गेल्या ३५ वर्षात केवळ पाच सहा वेळा जलयुक्त व जलपुनर्भरणाची कामे झाली .तेंव्हाच पाणी पातळीत वाढ होऊन तालुका टँकरमुक्त झालेला होता. पाण्याची ओरडही कमी झाली होती. पर्यावरणाच्या विनाशामुळे उदगीरचे सरासरी पर्जन्यमान इतिहासजमा होण्याची चिन्हे दिसत आहेत. मागच्या ५८ वर्षाच्या पर्जन्यमानाचा आढावा घेतला असता उदगीर तालुक्यात तब्बल ४३ वर्षे सरासरी इतका पाऊस झालेला नाही. उदगीर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८५० ते ९०० मि. मी. एवढे आहे.१९६५ पासून केवळ १३ वर्षच एक हजार मि. मी. च्या वर पाऊस होऊन  तालुक्याने पावसाची सरासरी ओलांडली होती. १९७१ साली ३८९ मि. मी. व १९७२ साली केवळ १७९ मि. मी. एवढाच पाऊस झाला होता. हे दोन्ही वर्ष दुष्काळी वर्ष म्हणून प्रसिद्ध होते. 

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रlaturलातूर