शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कचरा संकलनातही अहमदपूर पॅटर्न, बारकोड, मोबाइल ॲपवर हाेणार नाेंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:19 IST

अहमदपूर नगर परिषदेंतर्गत १७ हजार मालमताधारक असून, त्याचबराेबर शहरात प्रतिदिन दहा टनांपेक्षा अधिक कचरा जमा होत आहे. त्याचे व्यवस्थापन ...

अहमदपूर नगर परिषदेंतर्गत १७ हजार मालमताधारक असून, त्याचबराेबर शहरात प्रतिदिन दहा टनांपेक्षा अधिक कचरा जमा होत आहे. त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी दरवर्षी निविदा सादर केल्या जातात. मात्र, यावर्षी मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांच्या संकल्पनेतून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घनकचरा व्यवस्थापन केले जाणार आहे. त्यामध्ये शहरातील सर्व मालमत्ताधारकांना एक बारकोड दिला जाणार आहे. कचरा व्यवस्थापन करणारा कर्मचारी आपल्या मोबाइल ॲपद्वारे त्या बारकोडवर स्कॅन करेल आणि दररोजचा कचरा घेऊन जाईल. एखाद्या दिवशी त्यांनी स्कॅन नाही केला तर कचरा घेऊन गेला नाही, असे सिद्ध होणार आहे. ७० रुपये प्रतिमहिना दराने कचरा संकलन केले जाणार आहे. त्यातच त्याचे विलगीकरण करणे बंधनकारक आहे. त्यात प्लास्टिक कचरा, ओला कचरा, विलगीकरण करणे घनकचरा केंद्रावर वाहतूक करणे, त्यावर प्रक्रिया करणे, ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट करणे, प्लास्टिकचा पुनर्वापर करणे आणि त्याची विक्री करणे आदी नियम बंधनकारक आहेत. सदर घनकचऱ्याबरोबर अहमदपूर शहरातील नाल्या काढण्यासाठी ‘जीपीआरएस’चा वापर होणार असून, प्रतिमीटर प्रमाणे नाल्याचा दर ठरविण्यात आला आहे. तसेच या घनकचरा व्यवस्थापनाचे चार टप्पे करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात संकलन, दुसऱ्या टप्प्यात वर्गीकरण, तिसऱ्या टप्प्यात वाहतूक आणि चौथ्या टप्प्यात घनकचरा प्रक्रिया गृहीत धरून काम करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक असणाऱ्या कचऱ्याचे रिसायकलिंग करण्यासाठीसुद्धा यंत्रणा उभी करावी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाच्या निर्देशाप्रमाणे सदर घनकचरा जमा करायचा असून, झिरो गार्बेज पद्धत वापरली जाणार आहे. त्यामुळे शहरातील कचरा संकल प्रत्येक घराची अँड्रॉइड ॲपद्वारे नोंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन आणि नागरिकांनाही घनकचरा व्यवस्थापनाची इत्थंभूत माहिती मिळणार आहे. या आधुनिक नवतंत्रज्ञानामुळे होणारा अनियमितपणा, भ्रष्टाचार कमी होणार असून, यासाठी सर्वच नगरसेवकांनी सहकार्य केले असल्याचे नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले.

तंत्रज्ञानामुळे मानवी चुका कमी...

अनियमितता कमी दरवर्षी मनुष्यबळ कमी असणे वाहने नादुरुस्त असणे कचरा न उचलणे अशा अनेक समस्या येत होत्या. त्या समस्यांवर मात करण्यासाठी बारकोड पद्धत लागू केली असून, अँड्रॉइड ॲपद्वारे सदर व्यक्तीने जमा केलेल्या घराच्या तपशीलाची नोंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञानामुळे भ्रष्टाचार कमी होणार असल्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.

२०० रुपये दंड आकारला जाणार...

कचरा संकलन न केल्यास दंडाची तरतूद नगर परिषदेने अभ्यासपूर्ण रीतीने नियोजन तयार केले असून, त्यात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच एखाद्या मिळकतीचा कचरा न उचलल्यास, त्यासंबंधी तक्रार आल्यास दोनशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता होणार असल्याचे नगराध्यक्ष अश्विनी कासनाळे यांनी सांगितले.