शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी वैद्यकीय उपकरणांसाठी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून खरेदी करण्यात आलेल्या दहा व्हेंटिलेटर लोकार्पण कार्यक्रमात पालकमंत्री देशमुख बोलत ...

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून खरेदी करण्यात आलेल्या दहा व्हेंटिलेटर लोकार्पण कार्यक्रमात पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, मनोज पाटील, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्‍मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, माजी आ. वैजनाथ शिंदे, विजयकुमार ढगे यांची उपस्थिती हो.ती

पालकमंत्री म्हणाले, पणन विभागाच्या शासन निर्णयानुसार कोविडच्या प्रतिबंधासाठी दहा व्हेंटिलेटर खरेदी करून ते प्रशासनाला सुपुर्द करणारी लातूरची कृषी उत्पन्न बाजार समिती हे राज्यात पहिली आहे. जिल्ह्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी साथ रोग नियंत्रणासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. दुसऱ्या लाटेत जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासनाने नियोजन बद्ध केलेल्या कामगिरीमुळे जिल्ह्यात एकही अनुचित घटना घडलेली नाही. याबद्दल पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व प्रशासनाचे कौतुक केले. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुशंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीबद्दल समाधान व्यक्त केले.

शंभर दिवसांत लसीकरणाचे नियोजन...

नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे तंतोतंत पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. जिल्ह्याला लसीचा नियमितपणे पुरवठा झाला तर प्रशासनाने शंभर दिवसात जिल्ह्यातील शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन केलेले आहे. लसीचा तुटवडा असल्याने पुढील काळात वेळेत लस मिळेल यासाठी प्रयत्न केले जाणार असून किमान एका वर्षाच्या काळात जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन असल्याचेही पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले.