विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणारा आराेपी जाळ्यात, दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 22:07 IST2025-08-27T22:06:45+5:302025-08-27T22:07:06+5:30

विनापरवाना गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आराेपीला पाेलिसांनी बुधवारी अटक केली.

Accused of carrying a pistol without a license caught, valuables worth Rs. 2 lakh seized | विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणारा आराेपी जाळ्यात, दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त

विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणारा आराेपी जाळ्यात, दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त

विनापरवाना गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आराेपीला पाेलिसांनी बुधवारी अटक केली. त्याच्याकडून १ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत विवेकानंद चाैक ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, सण-उत्सव काळात सार्वजिक शांतता भंग करणाऱ्या, दहशत निर्माण करणाऱ्या, रेकॉर्डवरील, विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती संकलित करावी. त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश पाेलिस अधीक्षक अमाेल तांबे यांनी दिले. यानुसार विविध पाेलिस ठाण्यांकडून कारवाई केली जात आहे. विवेकानंद चौक ठाण्याचे पथक बुधवारी पहाटेच्या सुमारास गस्तीवर हाेते. खबऱ्याने माहिती दिली, नवीन रेणापूर नाका ते नवीन नांदेड नाका रिंगराेडवर विनापरवाना गावठी पिस्टल बाळगत एक तरुण फिरत आहे. पाेलिसांनी सापळा रचून दुचाकीसह (एम.एच. २४ ए.एन. ३२४०) त्यास ताब्यात घेतले. चाैकशी केली असता, त्याने अलोक विश्वनाथ चौधरी (वय ३६, रा. अंबाजोगाई रोड, लातूर) असे नाव सांगितले. पाेलिसांनी पिस्टल, १७ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

ही कारवाई पाेलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, डीवायएसपी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद चौक ठाण्याचे पोनि. संतोष पाटील, पोउपनि. सचिन रेडेकर, खुर्रम काझी, यशपाल कांबळे, रणवीर देशमुख, गणेश यादव, धैर्यशील मुळे, सचिन राठोड, आनंद हल्लाळे यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Accused of carrying a pistol without a license caught, valuables worth Rs. 2 lakh seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.