शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

कार-ट्रकच्या अपघातात आईसह मुलगा, दीर अशा तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 9:03 PM

औसा : मळणीयंत्रात साडीचा पदर अडकल्याने जखमी झालेल्या आईला उपचारासाठी लातूरला नेत असताना कार- ट्रकचा अपघात झाला.

औसा : मळणीयंत्रात साडीचा पदर अडकल्याने जखमी झालेल्या आईला उपचारासाठी लातूरला नेत असताना कार- ट्रकचा अपघात झाला. लातूर- निलंगा मार्गावरील फत्तेपूर पाटीनजीकच्या प्रभू खडी केंद्रासमोर झालेल्या या अपघातात आईसह मुलगा, दीर या तिघांचा जागीच मृत्यू झाला. दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास घडली.उमरगा तालुक्यातील कवठा येथील व्यंकट माधवराव माने (४५) यांच्या शेतात सोमवारी दुपारी १ वा. च्या सुमारास मळणीयंत्र सुरु होते. तिथे काम करणा-या पार्वतीबाई माधवराव माने यांच्या साडीचा पदर मळणीयंत्रात गेल्याने त्यांच्या गळ्यास फास बसला. तसेच डोक्यात, पाठीत मार लागला. त्यामुळे नातेवाईकांनी जखमी पार्वतीबाई यांना उपचारासाठी किल्लारीच्या खासगी दवाखान्यात आणले. परंतु, त्या गंभीर जखमी असल्याने लातूरला नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.त्यानुसार खासगी कार (एमएच १२, डीएम १८८) मधून लातूरला नेण्यात येत असताना लातूर- निलंगा मार्गावरील फत्तेपूर पाटीनजीकच्या प्रभू खडी केंद्रासमोर औसाहून लामजन्याकडे जाणा-या ट्रक (एमएच ११, एम ६९५३) ने जोरदार धडक दिली. त्यात आई पार्वतीबाई माधवराव माने (७०), मुलगा व्यंकट माधवराव माने (४५) आणि दीर बब्रुवान पांडुरंग माने (४७) (सर्वजण रा.कवठा, ता.उमरगा ) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारचालक गोपाळ सुरवसे (३५, रा़ कवठा, ता.उमरगा), गुरुनाथ उत्के (३७, रा़ तांबरवाडी, ता़ औसा) हे गंभीर जखमी झाले. ट्रक चालक फरार झाला आहे.दहा दिवसांतील दुसरी घटनालातूर- निलंगा मार्गावर आठवड्यात दुसरा अपघात झाला आहे. १८ नोव्हेंबर रोजी चलबुर्गा पाटीजवळ ट्रक व बसचा अपघात होऊन सात जणांचा बळी गेला होता.  ३० जण जखमी झाले होते. दरम्यान, सोमवारी सायंकाळी ट्रक -कारचा अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.माने कुटुंबावर काळाचा घालाजखमी आईला उपचारासाठी घेऊन जाताना हा अपघात झाला. त्यात आईसह मुलगा व दीराचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कवठा गावावर शोककळा पसरली आहे.अधिका-यांची घटनास्थळाकडे धावया अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक सालार चाऊस, काँग्रेसचे शहराध्यक्ष शकील शेख आदींनी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी नेण्याकरिता मदत केली.

टॅग्स :laturलातूरAccidentअपघात