धक्कादायक! लातुरात पाेलिस ठाण्याच्या आवारात बीडच्या तरुणाने पेटवून घेतले

By राजकुमार जोंधळे | Published: January 31, 2023 08:34 PM2023-01-31T20:34:16+5:302023-01-31T20:34:43+5:30

पेटवून घेतल्यानंतर पाेलिसांनी तातडीने धाव घेत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.

A youth from Beed set fire to police station premises in Latur; The reason is unclear | धक्कादायक! लातुरात पाेलिस ठाण्याच्या आवारात बीडच्या तरुणाने पेटवून घेतले

धक्कादायक! लातुरात पाेलिस ठाण्याच्या आवारात बीडच्या तरुणाने पेटवून घेतले

Next

लातूर : बीड जिल्ह्यातील एका २६ वर्षीय तरुणाने लातुरातील एका पाेलिस ठाण्याच्या आवारात पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना साेमवारी दुपारच्या सुमारास घडली. ही घटना लातुरातील विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्याच्या आवारात घडली असून, याबाबत तरुणाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, राजपाल कचरू बनसाेडे (वय २६ रा.लाेखंडी सावरगाव ता.अंबाजाेगाई जि.बीड ह.मु. एलआयसी काॅलनी, लातूर) हा विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यातच्या आवारात हा साेमवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास दाखल झाला. त्याने अचानकपणे स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पेटवून घेतल्यानंतर पाेलिसांनी तातडीने धाव घेत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यामध्ये राजपाल बनसाेडे हा तरुण जवळपास ३० टक्क्यांवर भाजल्याची माहिती समाेर आली आहे. पाेलिसांनी भाजलेल्या तरुणाला लातूर येथील शासकीय व सर्वाेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अप्पर पाेलिस अधिकारी डाॅ.अजय देवरे, पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर, सहायक पाेलिस निरीक्षक खंदारे, पाेलिस उपनिरीक्षक सावंत यांनी भेट दिली.

याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात पाेलिस हवालदार सुनील हराळे (वय ५४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजपाल कचरू बनसाेडे यांच्याविराेधात गुरनं. ७४ / २०२३ कलम ३०९ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास लातूर शहर उपविभागीय पाेलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे करत आहेत.

घटनेचे कारण अस्पष्ट...
लाेखंडी सावरगाव येथील राजपाल बनसाेडे या तरुणाने विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्याच्या आवारात पेटवून घेतल्याची घटना साेमवारी दुपारी घडली. या घटनेचे कारण मात्र दुसऱ्या दिवशीही समाेर आले नाही. नेमके काेणत्या कारणामुळे या तरुणाने ठाण्याच्या आवारात पेटवून घेतले, याचा तपास पाेलिस करत आहेत.

Web Title: A youth from Beed set fire to police station premises in Latur; The reason is unclear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.