लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर केला अत्याचार

By हरी मोकाशे | Updated: February 26, 2023 18:08 IST2023-02-26T18:07:25+5:302023-02-26T18:08:46+5:30

उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, तालुक्यातील एका २८ वर्षीय युवतीसोबत दुसऱ्या गावातील आरोपी मनोज चंद्रकांत मोरे (रा. शेल्हाळ, ता. उदगीर) याने लग्नाचे आमिष दाखवून जुलै २०२० पासून तिच्यावर वारंवार अत्याचार केला.

A young woman was raped by luring of marriage | लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर केला अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर केला अत्याचार

लातूर : उदगीर तालुक्यातील एका युवतीस लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. ती सहा महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर लग्नास नकार दिला. याप्रकरणी पीडित युवतीच्या तक्रारीवरुन उदगीर ग्रामीण पोलिसांत शनिवारी रात्री आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचारासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, तालुक्यातील एका २८ वर्षीय युवतीसोबत दुसऱ्या गावातील आरोपी मनोज चंद्रकांत मोरे (रा. शेल्हाळ, ता. उदगीर) याने लग्नाचे आमिष दाखवून जुलै २०२० पासून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यामुळे ती गरोदर राहिली. दरम्यान, ती वारंवार लग्न करण्याची मागणी करु लागली. तेव्हा आरोपीने मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही असे म्हणत लग्नास नकार दिला. त्यामुळे पीडित युवतीने शनिवारी रात्री उदगीर ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचारासह ॲट्रॉसिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन हे करीत आहेत.
 

Web Title: A young woman was raped by luring of marriage