उपचारासाठी दाखल कर्नाटकच्या महिलेने लातुरातील रुग्णालयात संपवलं जीवन
By राजकुमार जोंधळे | Updated: August 16, 2023 19:38 IST2023-08-16T19:37:26+5:302023-08-16T19:38:05+5:30
महिला रुग्णाने बाथरुममध्ये गळफास घेवून केली आत्महत्या

उपचारासाठी दाखल कर्नाटकच्या महिलेने लातुरातील रुग्णालयात संपवलं जीवन
लातूर : उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या महिला रुग्णाने बाथरुममध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे. शितल यादवराव हासुरे (वय ३८ रा. माेरखंडी ता. बसवकल्याण जि. बिदर) असे मयत महिलेची नाव आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील सिग्नल कॅम्प भागात असलेल्या अॅस्टर सिटी रुग्णालयात शितल हासुरे यांना १४ ऑगस्टराेजी रात्री उपचारासाठी दाखल करण्यात आले हाेते. दरम्यान, बुधवारी बाथरुमला जावून येते असे सांगून, त्यांनी बाथरुमधील वरच्या लाकडी फ्रेमला कापडी स्टाेलने गळफास घेत आत्महत्या केली. बराचवेळ महिला रुग्ण बाथरुममधून बाहेर येत नसल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यानंतर शिवाजीनगर पाेलिसांना याची माहिती देण्यात आली. पाेलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचानामा केला असून, आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
याबाबत शिवाजीगनर पाेलिस ठाण्यात वैद्याकीय अधिकारी डाॅ. ज्ञानेश्वर गाेपीनाथराव पांचाळ (वय ४६) यांनी दिलेल्या माहितीवरुन नाेंद करण्यात आली आहे. तपास पाेलिस हवालदार जी. के. भताने करत आहेत.