शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

Latur: खड्डा चुकवला पण एकाचा प्राण गेला; कारच्या धडकेत मोठ्या भावाचा मृत्यू, लहाना जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 18:10 IST

लातूर-जहिराबाद महामार्गावरील घटना; कार-दुचाकीच्या अपघातात एक ठार, तीन जखमी

निलंगा (जि. लातूर) : लातूर-जहिराबाद महामार्गावरील तळीखेड पाटीजवळ भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून, तिघेजण जखमी झाले आहेत. दत्ता सुरेश कदम (वय ३५ रा. सावरी ता. निलंगा) असे मयत युवकाचे नाव आहे.

निलंगा तालुक्यातील सावरी येथील दत्ता सुरेश कदम व दिगंबर सुरेश कदम हे दोन सख्खे भाऊ हैद्राबाद येथे नोकरीस आहेत. सावरीला पंढरपूरची पालखी येत असल्याने ते गावी आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर दोन्ही भाऊ एलआयसीचा हप्ता भरण्यासाठी निलंग्याला येत होते. मात्र, निलंगामार्गे औरादला जाणाऱ्या भरधाव कारने लातूर-जहिराबाद महामार्गावरील तळीखेड पाटीजवळ खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीला जोराची धडक दिली. यातील दुचाकीवरील दत्ता कदम यांचा जागीच मृत्यू झाला. तर दिगंबर कदम यांचा पाय तुटल्याने ते गंभीर जखमी झाले. कारमधील अतुल सुर्यवंशी आणि रुक्मिणी सारखे हे दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथोमपचार करुन पुढील उपचारासाठी लातुरला पाठविण्यात आले. मयताचे निलंगा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांना देण्यात आले. अपघातप्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

मोठ्या भावाचा मृत्यू, लहान भाऊ जखमी...सावरी येथील दत्ता कदम व दिगंबर कदम हे दोन सख्खे भाऊ हैद्राबाद येथे नोकरीला आहेत. गावात पालखी येणार असल्याने जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यासाठी दोघे गावी आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर एलआयसीचा हप्ता भरण्यासाठी ते निलंग्याकडे येत असताना कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात मोठा भाऊ दत्ता कदम यांचा जागीच मृत्यू झाला. तर लहान भाऊ दिगंबर कदम हा गंभीर जखमी झाला आहे.

 

टॅग्स :laturलातूरAccidentअपघातDeathमृत्यू