लातुरात आठ लाखांच्या एमडी ड्रग्जसह एक पिस्टल जप्त; तिघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 00:26 IST2025-07-11T00:26:11+5:302025-07-11T00:26:22+5:30

पोलिसांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून एकजण फरार झाला आहे.

A pistol along with MD drugs worth eight lakhs seized in Latur Three booked for crime | लातुरात आठ लाखांच्या एमडी ड्रग्जसह एक पिस्टल जप्त; तिघांवर गुन्हा

लातुरात आठ लाखांच्या एमडी ड्रग्जसह एक पिस्टल जप्त; तिघांवर गुन्हा

आशपाक पठाण

लातूर : शहरातील एलआयसी कॉलनी परिसरात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने छापा टाकून ८ लाख रूपये किंमतीचा ७८ ग्रॅम मेफेड्रोन म्हणजेच एमडी ड्रग्ज गुरूवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका घरातून जप्त केले. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून एकजण फरार झाला आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात लातूर पोलिसांकडून अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणात छापेमारी करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने गुरूवारी दुपारी एल.आय.सी कॉलनी परिसरातील एका घरामध्ये गणेश अर्जुन शेंडगे (वय २६, रा.एलआयसी कॉलनी, लातूर), रणजीत तुकाराम जाधव (वय २४, रा. दहिसर केमकतीपाडा, गोदावरी राणीचाळ, दहिरसर पूर्व, मुंबई) यांना ताब्यात घेतले. तर एकजण फरार झाला. त्यांच्याकडून एमडी (मेफेड्रोन) ड्रग्सची अवैध विक्री करणे साठी स्वतःच्या घरामध्ये बाळगलेले अंमली पदार्थ एकूण ७८.७८ ग्रॅम वजनाचा ३ लाख ९३ हजार ९०० रूपये किंमतीचा अंमली पदार्थ एमडी ड्रग्स, गुन्हयात वापरलेले वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, रोख रक्कम असा एकूण जवळपास ८ रूपयांचा ऐवज हस्तगत केला.

दोघांना अटक, एक फरार

एमडी ड्रग्सची विक्री करताना व गावठी पिस्टल बाळगलेले मिळून आलेल्या तीन जणांविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गणेश अर्जुन शेंडगे लातूर), रणजीत तुकाराम जाधव (मुंबई) या दोघांना अटक केली आहे. तर एकजण फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके, रियाज सौदागर, माधव बिलापट्टे, तुराब पठाण, मनोज खोसे, गोविंद भोसले, नवनाथ हासबे , नाना भोंग, मोहन सुरवसे, सचिन धारेकर, महादेव शिंदे, बंडू नीटुरे, सचिन मुंडे यांचा सहभाग होता.

Web Title: A pistol along with MD drugs worth eight lakhs seized in Latur Three booked for crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.