सकल मराठा समाजाच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन

By हरी मोकाशे | Published: March 10, 2024 06:57 PM2024-03-10T18:57:44+5:302024-03-10T18:57:57+5:30

कुणबी प्रमाणपत्रासाठी मराठवाड्यातील प्रकरणांमध्ये हैदराबाद गॅजेटचा आधार ग्राह्य धरण्यात यावा अशा मागण्यांसाठी एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.

A one-day dharna movement on behalf of the entire Maratha community | सकल मराठा समाजाच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन

सकल मराठा समाजाच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन

उदगीर: मराठा आरक्षण योध्दे मनोज जरांगे पाटील यांनी केलेली सगे साेयरे आरक्षणाची मागणी तात्काळ मंजूर करावी, यासह अन्य मागण्यांसाठी शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. सगे सोयरे या संज्ञेची परिभाषा विस्तृत करण्यासाठी मसुद्याचे तात्काळ कायद्यात रूपांतर करण्यात यावे, जळकोट तालुक्यातील मिळालेल्या कुणबी नोंदीच्या आधारे त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे, मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून ५० टक्केच्या आत असलेल्या कोट्यातून सरसकट आरक्षण तात्काळ मंजूर करण्यात यावे, कुणबी प्रमाणपत्रासाठी मराठवाड्यातील प्रकरणांमध्ये हैदराबाद गॅजेटचा आधार ग्राह्य धरण्यात यावा अशा मागण्यांसाठी एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात विवेक सुकने, संदीप पाटील, भास्कर पाटील, ज्ञानेश्वर भांगे, बाळासाहेब नवाडे, नेमिचंद पाटील, व्यंकट जाधव, सतीश पाटील, राहुल बिरादार, सचिन दापकेकर, राम रावणगावे, दिनकर बिरादार, प्रशांत बिरादार, प्रदीप पाटील, रामदास पाटील, पुंडलिक वाकडे, बालाजी बेळकोणे, गणेश मुंडकर, दशरथ कोयले, ऋषिकेश मुळे, अमोल पाटील, रविकिरण बिरादार, गिरीधर पाटील, राम शिलवणे, गिरीश सूर्यवंशी, विष्णू वासरे, पंकज कालानी, अभिषेक कुमठे, विष्णू आलट, तुकाराम मोरे, सिध्देश्वर लांडगे, शेख फिरोज, सतीश जगताप, आत्माराम बिरादार, श्रीनिवास एकुर्केकर, संग्राम पाटील, ज्ञानेश्वर पताळे, राजकुमार कानवटे, उदय मुंडकर, संग्राम पताळे, गोपाळ पाटील, धनराज बिरादार, कमलाकर कानवटे, श्रीधर जाधव, संजय पाटील, संभाजी कोयले, शिवाजीराव चंडकापूरे, बालाजी भोसले, भाऊसाहेब माने, शंकरराव पाटील, माधव पाटील, सर्जेराव भांगे, गणपतराव गादगे, बिपिन पाटील, यशवंत बिरादार आदी उपस्थित होते.

Web Title: A one-day dharna movement on behalf of the entire Maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.