मांसाहार जेवण बनवले नाही म्हणून दारुड्याने पत्नीवर चाकूने केले वार

By राजकुमार जोंधळे | Updated: September 6, 2022 11:48 IST2022-09-06T11:47:32+5:302022-09-06T11:48:14+5:30

लातुरातील घटना : पतीविराेधात गुन्हा दाखल

A drunkard husband stabbed his wife with a knife for not cooking a non-vegetarian meal | मांसाहार जेवण बनवले नाही म्हणून दारुड्याने पत्नीवर चाकूने केले वार

मांसाहार जेवण बनवले नाही म्हणून दारुड्याने पत्नीवर चाकूने केले वार

लातूर : जेवणासाठी बिर्याणी का बनवली नाही, म्हणून एकाने आपल्या पत्नीवर चाकूने वार केले आहेत. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना लातुरातील नांदेड राेड परिसरात कुष्ठधाम येथे घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, पूजा विक्रम देडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, ३१ ऑगस्टराेजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पती विक्रम विनायक देडे हा दारू पिऊन घरी आला हाेता. दरम्यान, पत्नीने त्यास जेवायला वाढले. यावेळी जेवणासाठी बिर्याणी का बनवली नाहीस? असे म्हणून पत्नीला शिवीगाळ करु लागला. हाॅटेलमधून बिर्याणी आणू दे असा तगदा लावला. फिर्यादीची सासू आणि इतर नातेवाईकांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, ताे काेणाचेही ऐकत नव्हता. पत्नीला लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी रागाच्या भरात त्याने जवळील चाकू काढत थेट पत्नी पूजाच्या डाेक्यावर वार केले. यामध्ये गभीर जखमी झालेलेल्या पत्नीला उपचारासाठी लातुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

उपचारानंतर विवेकांनद चाैक पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पती विक्रम विनायक देडे याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पाेलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी दिली.

Web Title: A drunkard husband stabbed his wife with a knife for not cooking a non-vegetarian meal