उदगीरात ९५ हजारांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST2021-09-19T04:21:14+5:302021-09-19T04:21:14+5:30

उदगीर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणावर भर देण्यात येत असून, उदगीर तालुक्यात आतापर्यंत ९५ हजार ५५२ जणांनी ...

95,000 people took corona vaccine in Udgira! | उदगीरात ९५ हजारांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस !

उदगीरात ९५ हजारांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस !

उदगीर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणावर भर देण्यात येत असून, उदगीर तालुक्यात आतापर्यंत ९५ हजार ५५२ जणांनी लसीकरणाचा पहिला, तर ४० हजार ४७४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण मोहिमेवर भर देण्यात येत असून, विविध आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरण मोहीम राबविली जात आहे.

उदगीर तालुक्यात मागणी तसा लसीचा पुरवठा होत असल्याने, लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अठरा वर्षांवरील नागरिकांना शासनाकडून मोफत लसीकरण चालू आहे. दुसऱ्या लाटेमध्ये तालुक्यात मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून येत होते. त्यातच उपचारासाठी आरोग्य यंत्रणेवर ताण पडला होता. त्यामुळे आरोग्य विभागाने लसीकरणावर भर दिला असून, नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारपर्यंत संपूर्ण तालुक्यात ९५ हजार ५५२ जणांनी कोरोनाची पहिली लस घेतली आहे. त्यामध्ये ७९ हजार ४९१ जणांनी कोविशिल्डचा तर १६ हजार ६१ जणांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे, तर ३१ हजार ६३६ जणांनी कोविशिल्डचा तर ८ हजार ८३८ जणांनी कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले आहेत. एकूण पात्र नागरिकांपैकी ४३ टक्के जणांनी पहिला डोस घेतला असून, १८ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

आराेग्य केंद्र स्तरावरही लसीकरण मोहीम...

उदगीर तालुक्यात ५ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, शहरातील सामान्य रुग्णालयातही लसीकरणाची मोहीम चालू आहे. देवर्जन, हंडरगुळी प्राथमिक आरोग्य केंद्र, हेर आरोग्य केंद्र, नळगीर प्राथमिक आरोग्य केंद्र, वाढवणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरण राबविले जात आहे. उदगीर सामान्य रुग्णालयात २४ हजार ६७ जणांनी कोविशिल्ड तर ६ हजार ४३५ असे एकूण ३० हजार ५०२ जणांनी पहिला डोस घेतलेला आहे, तर १२ हजार ७९३ कोविशिल्ड व ४ हजार ३१ कोव्हॅक्सिन असे १६ हजार ८२४ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

Web Title: 95,000 people took corona vaccine in Udgira!