एटीएम मशीन कटरने कापून सव्वाचार लाख लंपास, उदगीरमधील घटना
By संदीप शिंदे | Updated: February 26, 2024 18:04 IST2024-02-26T18:04:01+5:302024-02-26T18:04:47+5:30
हा रस्ता वर्दळीचा व राष्ट्रीय महामार्ग असलेल्या शेजारी असलेल्या एटीएममधून एवढ्या मोठ्या रकमेची चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

एटीएम मशीन कटरने कापून सव्वाचार लाख लंपास, उदगीरमधील घटना
उदगीर : शहरातील नांदेड रोड परिसरातील हरकरेनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम कटरने तोडून त्यातील ४ लाख २९ हजार ८०० रुपये लंपास केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, उदगीर शहरातील नांदेड रोडवरील हरकरेनगर भागात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. रविवारी रात्री साडेबारा ते पहाटे चारच्या दरम्यान चोरट्यांनी आत प्रवेश करून एटीएम मशीन गॅस कटरने तोडून मशीनमध्ये असलेले ४ लाख २९ हजार ८०० रुपये चोरून नेले. याबाबत व्यंकटेश श्रीनिवास देवनपल्ली यांनी दिलेल्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा रस्ता वर्दळीचा व राष्ट्रीय महामार्ग असलेल्या शेजारी असलेल्या एटीएममधून एवढ्या मोठ्या रकमेची चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तानाजी चेरले करीत आहेत.