शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालय, विद्यापीठांतील संशोधनासाठी वर्षाला २० हजार कोटी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 19:25 IST

नॅशनल रिसर्च फाऊंडेशनच्या स्थापनेकडे लक्ष

ठळक मुद्देभारतात १ लाख लोकांमागे संशोधन करणारे विद्यार्थी १५ आहेत़ दक्षिण कोरियासारख्या देशात ४़२ टक्के संशोधनावर खर्ची होतात़ 

- धर्मराज हल्लाळे

लातूर : विद्यापीठ व महाविद्यालयातील संशोधन कार्याला अनुदान, मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यासाठी नॅशनल रिसर्च फाऊंडेशनची (एनआरएफ) स्थापना करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे़ ज्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुसरून ही उद्घोषणा झाली, त्याच धोरणात संशोधन कार्यासाठी वार्षिक २० हजार कोटी रूपये अनुदान देण्याची शिफारस असल्याने एनआरएफच्या स्थापनेकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे़ 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी २०१९ च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा संदर्भ देत विविध ज्ञानशाखेतील संशोधन एकाच संस्थेच्या छताखाली आणत असल्याचे सांगितले़ ज्यामुळे विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्रे, कला तसेच आवश्यकतेप्रमाणे कृषी, आरोग्य क्षेत्रातील संशोधनाला वाव मिळणार आहे़ मात्र प्रत्यक्षात एनआरएफच्या स्थापनेनंतर वर्षाला जीडीपीच्या १ टक्के अथवा २० हजार कोटी रूपये वार्षिक अनुदान देण्याच्या शिफारशीचा स्पष्ट उल्लेख अर्थमंत्र्यांनी केलेला नाही़ 

राज्य सरकारांची संशोधनाला पाठ़शिक्षण हा विषय सामायिक सुचित असल्याने केंद्राबरोबर राज्य सरकारही शिक्षणावर खर्च करते़ केंद्राच्या अनुदानात राज्याचाही वाटा असतो़ राष्ट्रीय शिक्षण धोरणातील माहितीनुसार देशभरातील राज्य सरकारांनी संशोधनासाठी नगण्य गुंतवणूक केली आहे़ उदाहरणादाखल राष्ट्रीय उच्चस्तर अभियानांतर्गत (रूसा) महाविद्यालयांना दिल्या जाणाऱ्या केंद्राच्या अनुदानात ४० टक्के वाटा राज्याचा आहे मात्र तो मिळत नसल्याचेच चित्र आहे़ 

उच्च शिक्षणाचे बजेट ३८ हजार कोटींचे; संशोधनासाठी २० हजार कोटी देणार कसे ?केंद्रीय अर्थमंत्र्यांनी थेट आकड्यात सांगितले नसले तरी एनआरएफची ज्या धोरणानुसार स्थापना होणार आहे़ त्यातील उल्लेखानुसार २० हजार कोटींची वार्षिक तरतूद करायची आहे़ प्रत्यक्षात सबंध उच्च शिक्षणाचे बजेट ३८ हजार ३१७ कोटींचे आहे़ त्यात संशोधनासाठी वार्षिक २० हजार कोटी सरकार कसे उभारणार याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष असणार आहे़  एकंदर, शासनाचे अनेक विभाग व मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या संशोधन कार्याचा एकत्रित निधी मिळून केंद्र शासन २० हजार कोटींचा मेळ बसविण्याची शक्यता आहे़ तरी आजवरचा संशोधन कार्याचा इतिहास आणि त्यासाठी दिलेला निधी निराशाजनक आहे़ २००४ मध्ये जीडीपीच्या ०़८४ टक्के गुंतवणूक संशोधनावर झाली़ तर २०१४ मध्ये त्यात घट होऊन गुंतवणूक ०़६९ टक्क्यावर आली आहे़ तुलनेने चीनमध्ये जीडीपीच्या २़१ टक्के तर दक्षिण कोरियासारख्या देशात ४़२ टक्के संशोधनावर खर्ची होतात़ 

२०१६-१७ च्या आर्थिक सर्व्हेक्षणानुसार भारतात १ लाख लोकांमागे संशोधन करणारे विद्यार्थी १५ आहेत़ तर शेजारील चीनमध्ये १११, अमेरिकेत ४२३, इझराईलमध्ये ८२५ विद्यार्थी संशोधन करतात़ ज्यामुळे भारत नवीन शोधांच्या पेटेंटमध्ये पिछाडीवर आहे़ जागतिक बौद्धिक संपदा संस्थेच्या नोंदीनुसार चीनने १३ लाख ३८ हजार ५३० पेटेंट अर्ज दाखल केले़ ज्यामध्ये १० टक्के अनिवासी चिनी लोकांचे होते़ तर भारताने ४५ हजार ५७ पेटेंट दाखल केले त्यातही ७० टक्के अनिवासी भारतीयांचे आहेत़

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019laturलातूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी