बिलोली तालुक्यातील लोकशिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाºया तीन वेगवेगळ्या शाळेतील शिक्षक व संस्थाचालकाचा अंतर्गत वाद विकोपाला गेला असून शुक्रवारी सर्व शिक्षकांनी शिकवणीवर सामूहिक बहिष्कार टाकला़ ...
गणेशोत्सवात थर्माकोलचे मखर व सजावटीच्या वस्तूंवरील बंदी उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. थर्माकोल फॅब्रिकेटर अॅण्ड डेकोरेटर असोसिएशनने केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. ...
सहावीच्या भूगोल विषयाच्या पुस्तकात गुजराती भाषेत धडा छापल्यावरून विधान परिषदेत शुक्रवारी गदारोळ झाला. विरोधकांनी ‘ती’ पाने नंतर जोडल्याचा आरोप सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी करताच, मी खोटा असेन, तर सभागृहात विष घेऊन आत्महत्या करेन ...
विद्याविहार-भायखळा मार्गादरम्यान धिम्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेकडून माटुंगा रोड - मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात ...
२१ आठवड्यांच्या अल्पवयीन गर्भवतीला गर्भपात करण्याची परवानगी देत, उच्च न्यायालयाने शुक्रवारी तिला मोठा दिलासा दिला आहे. बलात्कारामुळे पीडितेला गर्भधारणा झाल्याने तिच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली. ...
या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईत जागोजागी पाणी साठल्याने व रेल्वे सेवा ठप्प झाल्याने मुंबईकरांचे हाल झाले. याची दखल घेत उच्च न्यायालयाने गेली तीन वर्षे मुंबईची स्थिती ‘जैसे-थे’ असल्याचे म्हणत महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. ...
मुंबईतील खड्ड्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसने मुंबईतील खड्डे मोजण्याची मोहीम छेडली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने चक्क खड्ड्यांना आयुक्त व अधिकाऱ्यांचे नाव दिले आहे, तर मनसेने या वर्षी गांधीगिरी मार्गाने खड्डे बुजविले आहेत. ...
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) मुंबईत आरटीई प्रवेशाच्या दुसºया फेरीतील प्रवेश घेण्यासाठी २५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. दुस-या फेरीनंतर इतका काळ लोटूनही अद्याप तिस-या लॉटरीसाठी शिक्षण विभागाला मुहूर्त मिळालेला नाही. ...