या सर्वांना सत्र न्यायालयाने भादंवि कलम ३३० अन्वये तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा दिली होती. उच्च न्यायालयानेही ती कायम केली होती. ही शिक्षा वाढवावी यासाठी राज्य सरकारने केलेले अपील मंजूर करून हा निकाल दिला. ...
राज्याच्या सर्व भागात पाऊस पोहोचला असून १ जून ते ४ सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८२३ मि.मी. म्हणजेच पाऊस झाला असून जलाशयांमध्ये ६६.१ टक्के साठा निर्माण झाला आहे. खरीप हंगामात ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली. ...
वसई - वसईतील शिधावाटप केंद्रात येणारा रॉकेल केवळ काळ्याबाजारात नव्हे तर चक्क गावठी दारू बनविण्यासाठी वापरला जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी नालासोपारा पश्चिमेच्या कळंब येथे छापा मारून ७०० लिटर रॉकेल आणि दारूसाठी ल ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजापोटीचे ६ हजार ३३९ कोटी रुपये राज्य शासन आपल्या तिजोरीतून देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
केजी टू पीजी शिक्षणक्रमात शासन निर्णयाचा वारंवार होत असलेला गोंधळ अन् शिक्षक दिनी रस्त्यावर उतरणारे शिक्षक, प्राध्यापक या सर्व प्रक्रियेत सरकारचा विधायक हस्तक्षेप दिसत नाही, हे अधिक गंभीर आहे. ...