अॅमेझॉनने आज आंतरारष्ट्रीय बाजाराला केले आश्चर्यचकित; 1 हजार अब्जांचा टप्पा पार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 10:59 PM2018-09-04T22:59:29+5:302018-09-04T23:01:40+5:30

असा चमत्कार करणारी अॅमेझॉन ही अमेरिकेची दुसरी आणि जगातील तिसरी कंपनी बनली आहे.

Amazon is amazed at the international market today; 1 trillion crossed | अॅमेझॉनने आज आंतरारष्ट्रीय बाजाराला केले आश्चर्यचकित; 1 हजार अब्जांचा टप्पा पार

अॅमेझॉनने आज आंतरारष्ट्रीय बाजाराला केले आश्चर्यचकित; 1 हजार अब्जांचा टप्पा पार

Next

वॉशिंग्टन : ऑनलाईन सेवेद्वारे वस्तू पुरविणारी कंपनी अॅमेझॉनने आज आंतरराष्ट्रीयबाजारात मैलाचा दगड पार केला आहे. अमेझॉनचे बाजारमुल्य आज 1 हजार अब्जांचा टप्पा पार केला. याबरोबर असा चमत्कार करणारी अॅमेझॉन ही अमेरिकेची दुसरी आणि जगातील तिसरी कंपनी बनली आहे. मंगळवारी या कंपनीचा शेअर 2050.50 डॉलरवर पोहोचला होता. 

अॅपल कंपनीने ऑगस्टमध्येच 1 हजार अब्ज डॉलरचा टप्पा पार केला होता. तर 2007 मध्ये शांघायच्या शेअर बाजारात पेट्रोचाइना या कंपनीचे बाजारमुल्य 1 हजार अब्जवर पोहोचले होते. मात्र, बाजार संपण्यापर्यंत ते पुन्हा खाली आले होते. 

अॅमेझॉन कंपनीचा शेअर गेल्या वर्षभरात 108 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर जानेवारीच्या एका महिन्यातच 74 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे. मागिल तीन महिन्यांत गुंतवणूकदारांना 20 टक्के नफा मिळाला आहे. तर गेल्या महिन्यात 12 टक्के वाढला आहे. 

अॅमेऑनचे संस्थापक जगातील सर्वात श्रीमंत 
अॅमेऑनचे संस्थापक जेफ बेजोस जगातील सर्वात श्रीमंत बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार 166 अब्जांच्या संपत्तीचे मालक बेजोस जगातील अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. यावर्षी त्यांच्या संपत्तीत 66.5 अब्ज डॉलरची वाढ झाली. बिल गेट्स 98.1 अब्ज डॉलरच्या संपत्तीवर दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

Web Title: Amazon is amazed at the international market today; 1 trillion crossed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.