या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल ९१.८ रुपये लिटर झाले. पेट्रोलचा दर मुंबईत ९८.१२ रुपये, कोलकोत्यात ९१.९२ रुपये आणि चेन्नईत ९३.६२ रुपये लिटर झाला. ...
कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर २४ एप्रिल रोजी ही योजना तिसऱ्यांदा सुरू करण्यात आली. या योजनेत तब्बल ८०० दशलक्ष लोकांना सामावून घेण्यात आले आहे. ...
महाराष्ट्र शासनाने खरेदी केलेली लस केंद्र शासनाच्या लसीकरण कार्यक्रमासाठी वापरावी लागणार असल्याने, १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण तूर्त काही दिवसांसाठी कमी करण्याबाबत राज्य टास्क फोर्सशी चर्चा केली जाईल. ...
गोव्यात गेल्या १० दिवसांत ५०० हून अधिक रुग्णांचे बळी गेले. यापैकी बहुतांश मृत्यू गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत. रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने त्यांचे मृत्यू ओढावत असल्याच्या तक्रारी त्यांचे नातेवाईक करीत आहेत. ...
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) यासंदर्भात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडी आता त्यातील आर्थिक व्यवहारांबाबत देशमुख यांच्याकडे चौकशी करणार आहे. प्राथमिक तपासानंतर त्यांना त्यासाठी समन्स बजाविले जातील, असे सूत्रांनी सांगितले. ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र काकडे याने गेल्या 7 मेरोजी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. (CM Uddhav Thackerays wife Rashmi Thackeray) ...