Corona Virus Pune: दिलासादायक! पुणे जिल्ह्यात मंगळवारी ७ हजार ७१४ नवे रुग्ण; ८ हजार ७७५ जणांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 11:43 PM2021-05-11T23:43:26+5:302021-05-11T23:43:50+5:30

पुणे जिल्ह्याची सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ९० हजार ७४७

Corona Virus Pune: Comfortable! 7 thousand 714 new patients in Pune district on Tuesday; 8 thousand 775 people defeated Corona | Corona Virus Pune: दिलासादायक! पुणे जिल्ह्यात मंगळवारी ७ हजार ७१४ नवे रुग्ण; ८ हजार ७७५ जणांची कोरोनावर मात

Corona Virus Pune: दिलासादायक! पुणे जिल्ह्यात मंगळवारी ७ हजार ७१४ नवे रुग्ण; ८ हजार ७७५ जणांची कोरोनावर मात

Next

पुणे : पुणे जिल्ह्यात मंगळवारी ७ हजार ७१४ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ८ हजार ७७५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी पुणे शहरात वारी २ हजार ४०४ तर पिंपरीत १ हजार ५४७ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. तसेच पुणे शहरात ३ हजार ४८६ तर पिंपरीत १ हजार ९९९ जण कोरोनातून ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात विविध रुग्णालयातील दिवसभरात एकूण १४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पुणे जिल्ह्याची सक्रिय कोरोना ९० हजार ७४७ झाली असून त्यात ६१ हजार २४९ हॉस्पिटलमध्ये तर २९ हजार ४९८ गृह विलगिकरणात आहे. 
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १४ हजार ६४२ झाली आहे. तर शहरात संख्या ७ हजार ६३० झाली आहे. जिल्ह्यात आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ८लाख २८ हजार २९६ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ९ लाख ३३ हजार ५१६ झाली आहे.

पुणे शहरात सक्रिय रुग्णसंख्या २९ हजार ७०२ तर पिंपरीत २० हजार ४९४ इतकी आहे. तर पुणे शहरात एकूण रुग्णसंख्या ४ लाख ५० हजार १३३ तर कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ४ लाख १२  हजार ९७० इतकी आहे. पिंपरीत एकूण रुग्णसंख्या २ लाख ३२ हजार ९०४ तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २ लाख ८ हजार ९८७ इतकी आहे.

आज पुणे जिल्ह्यात ३२ जणांची तपासणी करण्यात आली. तर पुणे शहर ११ हजार ९९६ आणि पिंपरीत ८ हजार ५१० जणांची तपासणी झाली.

Web Title: Corona Virus Pune: Comfortable! 7 thousand 714 new patients in Pune district on Tuesday; 8 thousand 775 people defeated Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.