उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या बालाजीनगर येथील मे. भैरवनाथ शुगर वर्क लिमिटेड संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करीत शिवसैनिकांनी शनिवारी जोरदार घोषणाबाजी केली. ...
शिवसेनेतील सर्वात मोठ्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात ही बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे आले तेव्हा शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांचे स्वागत केले. ...
शिंदे गटाकडून मिळालेल्या माहितीनुसार ते असा दावा करणार आहेत, की शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही स्वतंत्र गट स्थापन केलेला नाही. शिंदे हे आधीपासूनच शिवसेना गटनेते होते. ...
दोघांनी अमित शहा यांच्याशी राजकीय घडामोडी व पुढील रणनीतीबाबत चर्चा केली. सरकार स्थापन करण्यात येत असलेल्या कायदेशीर अडचणी व त्याबाबत उचललेली पावले यासंदर्भात फडणवीस यांनी शहा यांना माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
शिवसेनेतील आघाडीचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने निर्माण झालेला राजकीय पेच पाचव्या दिवशीही कायम होता. दरम्यान, बंडखोर आमदारांविरुध्द राज्यात विविध ठिकाणी संतप्त शिवसैनिकांनी तोडफोड सुरु केली आहे. ...