शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ZP Election kolhapur- पी. एन. यांच्या आग्रहामुळे निवडीमध्ये पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 12:12 IST

ZP Election : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आमदार पी. एन. पाटील हे चिरंजीव राहुल यांच्यासाठी आग्रही असल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. त्यातून आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील काय मार्ग काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राहुल पाटील उमेदवार नसतील तर आम्हाला गृहित धरू नका, अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी घेतल्याचा दावा पी. एन. यांच्या गटाकडून केला जात आहे.

ठळक मुद्देपी. एन. यांच्या आग्रहामुळे निवडीमध्ये पेच अध्यक्षपदाच्या नावामुळे संख्याबळावर परिणामाची शक्यता

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आमदार पी. एन. पाटील हे चिरंजीव राहुल यांच्यासाठी आग्रही असल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. त्यातून आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील काय मार्ग काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राहुल पाटील उमेदवार नसतील तर आम्हाला गृहित धरू नका, अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी घेतल्याचा दावा पी. एन. यांच्या गटाकडून केला जात आहे.सर्वांत आधी तीन महिन्यांपूर्वीच पी. एन. यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन राहुल यांना अध्यक्षपदाची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. राहुल पाटील यांनी गेल्या आठवड्यात जिल्हा बँकेत मुश्रीफ यांची तर अजिंक्यतारावर सतेज पाटील यांची भेट घेतली होती. मात्र, अर्ध्या तासांतच मुश्रीफ यांनी अध्यक्ष राष्ट्रवादीचा असेल, अशी घोषणा केल्याने युवराज पाटील यांचे नाव चर्चेत आले. सतेज पाटील यांनीही काँग्रेसने अध्यक्षदावरील दावा सोडला नसल्याचे स्पष्ट केल्याने आणखी संभ्रम वाढला.अशातच राहुल पाटील यांनी सदस्यांच्या गाठीभेटी सुरूच ठेवल्या. शुक्रवारच्या बैठकीला पी. एन. शेवटच्या टप्प्यात आले. सदस्यांशी चर्चा झाल्यानंतर सर्व नेतेमंडळी मुश्रीफ यांच्या दालनामध्ये गेली. परंतु तेथे फारशी चर्चा झाली नसल्याचे समजते. त्यामुळे तेथून पी. एन. लगेचच बाहेर पडले.

चार वर्षांपूर्वीच्या निवडीवेळी गणित न जमल्याने आता मात्र पी. एन. पाटील यांच्या समर्थकांनी पी. एन. यांच्यावरच दबाव वाढविला आहे. राहुल पाटील यांच्यासाठी कोण कोण वेगळी भूमिका घेऊ शकते अशा काही सदस्यांची यादी तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.पी. एन, राजू शेट्टी यांची भेटशासकीय विश्रामगृहावरील बैठकीनंतर शाहूपुरीतील श्रीपतरावदादा बँकेत पी. एन. आणि राजू शेट्टी यांच्यात चर्चा झाली. राहुल जर अध्यक्षपदाचे उमेदवार असतील तर शेट्टी त्यांना पूरक भूमिका घेतील, अशी या बैठकीनंतर चर्चा सुरू झाली.पी.एन., मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यात बैठकीची शक्यतागोकुळच्या निवडणुकीमुळे जरी सतेज आणि पी. एन. एकमेकांविरोधात लढले असले तरी सतेज यांनी पी. एन. यांच्यावर एकाही ह्यशब्दाह्णने टीका केली नाही. त्यामुळेच राहुल यांना अध्यक्षपद मिळावे यासाठी पी. एन. यांनी शुक्रवारी सायंकाळी सतेज यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शनिवारी किंवा अगदीच शक्य झाले नाही तर पन्हाळ्यावर रविवारी मुश्रीफ, सतेज पाटील आणि पी. एन. यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर