कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील कळे येथील एका बारमध्ये पूर्ववैमनस्यातून कारणावरून एका तरुणाला धारदार चाकूने भोसकल्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेत मयूर सुंदर बचाटे (वय २१, रा. शहाजी वसाहत, रेसकोर्स नाक्याजवळ, कोल्हापूर) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पन्हाळा तालुक्यातील कळे येथील एका रुग्णालयाशेजारील बारमध्ये रविवारी रात्री मयूर बचाटे याचे पाटील आडनावाच्या व्यक्तीसोबत पूर्ववैमनस्यातून वादावादी झाली. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. त्यात संबंधित व्यक्तीने मयूरच्या पोटात धारदार चाकूने भोसकून प्राणघातक हल्ला केला. हा प्रकार रविवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास झाला. जखमी मयूरला तातडीने कोल्हापुरात सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मयूरचा मावसभाऊ पृथ्वी रमेश कुर्डे याने फिर्याद दिली असून कळे पोलिस अधिक तपास करत आहेत.
Web Summary : In Kolhapur, a 21-year-old was stabbed in a bar following a dispute stemming from past animosity. The victim is hospitalized in critical condition. Police are investigating the incident.
Web Summary : कोल्हापुर में, पुरानी दुश्मनी के कारण एक बार में 21 वर्षीय युवक पर चाकू से हमला किया गया। पीड़ित गंभीर हालत में अस्पताल में भर्ती है। पुलिस मामले की जांच कर रही है।