शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या तरुणाईने केला ‘केदारकंठा’ सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : तापमान उणे १० अंश डिग्री सेल्सियस, स्नो फॉल, बर्फाळ प्रदेशातील अस्वलांची भीती, हजार फूट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : तापमान उणे १० अंश डिग्री सेल्सियस, स्नो फॉल, बर्फाळ प्रदेशातील अस्वलांची भीती, हजार फूट चढाई ८० डिग्रीमध्ये करावी लागते अशा आव्हानांना तोंड देत कोल्हापुरातील राहुल मेस्त्री, योगेश चौगुले व रोहित चौगुले या तरुणाईने उत्तराखंडमधील केदारकंठा ही अत्यंत जोखमीची १२ हजार ५०० फुट उंचीचा ट्रेक पूर्ण केला आहे.

राहुल मेस्त्री याचा दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय आहे. योगेश यांची बॉक्स बनवायची फॅक्टरी तर रोहित यांचे हॉटेल आहे. या तिघांनी १७ तारखेला कोल्हापुरातून प्रवासाला सुरुवात केली. डेहराडूनवरून संकरी गावात पोहोचले. या गावापासून पुढे ट्रेकला सुरुवात होते. चढायला तीन दिवस आणि उतरायला तीन दिवस आणि प्रवास असा एकूण आठ दिवसांचा कालावधी. संपूर्ण परिसर बर्फाळ असल्याने कधिही स्नो फॉल सुरू होतो. रात्री उणे १० डिग्री सेल्सिअस इतके तापमान असते. शिवाय अस्वलांची भीती, बर्फ पडू लागला की झोपतो तो टेंटदेखील बर्फाच्या ओझ्याने पडले याची भीती , मग प्रत्येकाने आळीपाळीने काही तासांसाठी जागरण करायचे आणि टेंटवर बर्फ साचू द्यायचा नाही. पहारा ठेवायचा. यादरम्यान दिवसादेखील समोरचे दृश्य दिसत नाही अशा पद्धतीने व्हाइट आउट होतो. या काळातला प्रवास अधिक धोकादायक. अशी ही अत्यंत जोखमीची ट्रेक या तरुणाईने यशस्वीपणे सर केली आहे. या समीर पॉइंटवरून हरकी धून, स्वर्गरोहिणी असे पीक पॉइंटदेखील दिसतात. इंडिया हाईकस संस्थेतर्फे यांनी ही ट्रेक पूर्ण केली आणि परिसराची स्वच्छता राखण्यासाठी वाटेत पडलेला कचरा गोळा करत त्याचे वर्गीकरण करून पुनर्वापरासाठीच्या प्रक्रियेलाही पाठविण्यात आले.

--

फोटो नं २८०१२०२१-कोल-केदारकंठा ट्रेक

ओळ : कोल्हापुरातील योगेश चौगुले, राहुल मेस्त्री व रोहित चौगुले या तरुणांनी उत्तराखंडमधील केदारकंठा ही जोखमीची ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केली.

--