Kolhapur: विजेच्या धक्क्याने बच्चे सावर्डेतील तरुणाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 18:27 IST2025-03-18T18:26:07+5:302025-03-18T18:27:18+5:30

देवाळे : जनावरांसाठी वैरण कडबा कुट्टी करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला. सोमनाथ साथीराम बच्चे (वय ३६, रा. बच्चे सावर्डे, ता पन्हाळा) ...

Youth from Bache Sawarde dies of electric shock | Kolhapur: विजेच्या धक्क्याने बच्चे सावर्डेतील तरुणाचा मृत्यू 

Kolhapur: विजेच्या धक्क्याने बच्चे सावर्डेतील तरुणाचा मृत्यू 

देवाळे : जनावरांसाठी वैरण कडबा कुट्टी करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला. सोमनाथ साथीराम बच्चे (वय ३६, रा. बच्चे सावर्डे, ता पन्हाळा) असे मृताचे नाव आहे. आज मंगळवारी (दि.१८) ही दुर्दैवी घटना घडली.

सोमनाथ हे आपल्या घरा पाठीमागील जनावरांच्या गोठ्यामध्ये वैरण कुट्टी करण्यासाठी चाप कटर चालू करत होते. दरम्यान, त्यांना विजेचा शॉक लागल्याने ते मशीन जवळच चिकटून राहिले. वेळीच त्यांचा भाऊ दत्तात्रेय याने वीज पुरवठा बंद केला. उपचारासाठी सोमनाथ यांना कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

शेतीबरोबरच हॉटेल व्यवसाय करणाऱ्या मनमिळाऊ सोमनाथ यांच्या अचानक मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Youth from Bache Sawarde dies of electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.