कोल्हापूर: पालेश्वर येथील सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यात युवक बुडाला, शोध कार्य सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 12:58 IST2022-08-16T11:49:07+5:302022-08-16T12:58:45+5:30

आज, मंगळवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरु करण्यात आले आहे.

Youth drowned in water flowing from Paleshwar Dam kolhapur district, search operation started | कोल्हापूर: पालेश्वर येथील सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यात युवक बुडाला, शोध कार्य सुरु

कोल्हापूर: पालेश्वर येथील सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यात युवक बुडाला, शोध कार्य सुरु

शाहूवाडी : पालेश्वर तालुका शाहूवाडी येथील सांडव्यातून पडत असलेल्या पाण्यात हातकणंगले तालुक्यातील लाटवडे युवक बुडाला. राजेश बाबुराव पाटील (वय ३५) असे या बुडालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, जीवनरक्षक रेस्क्यू फोर्सच्या वतीने शोध कार्य सुरू आहे.

राजेश पाटील आपल्या मित्रांच्या समवेत काल, सोमवारी पालेश्वर सांडव्यातून पडत असलेल्या पाण्याच्या ठिकाणी धबधबा पाहण्यासाठी गेले होते. यावेळी ते सांडव्यातून पडत असलेल्या पाण्यात बुडाले. सोबत असलेल्या मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरु होते मात्र, अंधार पडल्यानंतर ते थांबवण्यात आले. आज, मंगळवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरु करण्यात आले आहे. या घटनेची फिर्याद विकास माळी यांनी शाहूवाडी पोलिसात दिली आहे

Web Title: Youth drowned in water flowing from Paleshwar Dam kolhapur district, search operation started