मुलांमधील भांडणाचा राग मनात धरुन तरुणावर केले कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 18:31 IST2021-12-09T18:26:12+5:302021-12-09T18:31:28+5:30

लहान मुलांमधील भांडणाचा राग मनात धरून एकाने कोयत्याने केलेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला.

Youth attacked at Wadange in Karveer taluka of Kolhapur district | मुलांमधील भांडणाचा राग मनात धरुन तरुणावर केले कोयत्याने वार

मुलांमधील भांडणाचा राग मनात धरुन तरुणावर केले कोयत्याने वार

कोल्हापूर : लहान मुलांमधील भांडणाचा राग मनात धरून एकाने कोयत्याने केलेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. किशोर भरत पाटील (वय ३२, रा. वेताळ गल्ली, वडणगे) असे या जखमी तरुणाचे नाव आहे. करवीर तालुक्यातील वडणगे येथे ही घटना घडली.

वडणगे येथे लहान मुलांमध्ये झालेला वाद किशोर पाटील याने मिटवला होता. पाटील हे मित्रासह गावातील चौकात उभारले होते. पूर्वीच्या वादाचा राग मनात धरून गणेश रामचंद्र शिंदे (रा. वडणगे) याने पाठीमागून येऊन त्यांना धक्का दिला, त्यानंतर शिवीगाळ करून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यात किशोर पाटील जखमी झाले.

परिसरातील नागरिकांनी हा वाद मिटवून संशयित शिंदे याला घरी घालवले. त्यानंतर संशयित शिंदे हा काहीवेळाने परत आला, त्याने पाटील यांना त्यांच्या घराच्या दारातच गाठून पुन्हा काठीने मारहाण केली. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात गणेश शिंदे याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Youth attacked at Wadange in Karveer taluka of Kolhapur district