इचलकरंजी : येथील आवाडे अपार्टमेंट परिसरात नशिले प्रतिबंधित इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या युवकास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. साहील किरण पाटील (१९, रा. यड्राव, ता. शिरोळ) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून मेफेन्टरमाइन सल्फेट टर्मिनल आणि ओफेनच्या प्रतिबंधित नशिल्या इंजेक्शनच्या ६७ बाटल्या, रोख रक्कम, मोपेड गाडी असा एक लाख १२ हजार ३९१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.वस्त्रनगरीत नशिल्या पदार्थांचा सुळसुळाट सुरू आहे. यापूर्वीही आवाडे अपार्टमेंट परिसरात नशिल्या इंजेक्शन विक्रेत्यावर कारवाई केली होती. गुरुवारी (दि. २२) रात्रीच्या सुमारास गोविंद अपार्टमेंट ते आवाडेनगर रोडवर साहील हा नशिले इंजेक्शन विक्रीसाठी आल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना समजली. त्यानुसार तेथे सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता २० हजार ४६६ रुपयांच्या ३० मिलीच्या मेफेन्टरमाइन सल्फेट टर्मिनलच्या ५४ बाटल्या आणि ५ हजार ५२५ रुपयांच्या ३० मिलीच्या मेफेन्टरमाइन सल्फेट ओफेनच्या १३ बाटल्या अशा एकूण ६७ बाटल्या मिळून आल्या. त्याचबरोबर १४०० रुपयांची रोकड, १५ हजार रुपयांचा मोबाइल आणि ७० हजार रुपये किमतीची मोपेड असा एकूण एक लाख १२ हजार ३९१ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याबाबत पोलिस हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ चौगले यांनी फिर्याद दिली आहे.
Web Summary : Ichalkaranji: A youth was arrested for selling banned drug injections. Police seized 67 bottles of mephentermine sulfate and other materials worth ₹1,12,391. The accused, Sahil Patil, is in police custody. Police are investigating the illegal drug trade in the area.
Web Summary : इचलकरंजी: प्रतिबंधित नशीले इंजेक्शन बेचने के आरोप में एक युवक गिरफ्तार। पुलिस ने 1,12,391 रुपये मूल्य की मेफेनटर्माइन सल्फेट की 67 बोतलें और अन्य सामग्री जब्त की। आरोपी साहिल पाटिल पुलिस हिरासत में। पुलिस इलाके में अवैध नशीले पदार्थ के व्यापार की जांच कर रही है।