शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

पतंग उडतोय तुमचा; जीव जातोय मात्र आमचा !

By admin | Updated: November 10, 2014 00:44 IST

आठवड्यात १० पक्ष्यांना जीवदान : रविवारीही वाचविला ‘धनेश’ अर्थात ‘कॉमन ग्रे हॉर्नबिल’ चा जीव

कोल्हापूर : नोव्हेंबर महिन्यामध्ये पतंग उडविण्यासाठी पोषक असे वारे वाहत असते. मात्र, पतंग उडविताना पतंगाचा मांजा दोरा आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या जिवावर बेतू लागला आहे. गेल्या आठवडाभरात विविध जातींच्या दहा पक्ष्यांवर पांजरपोळ येथे उपचार करून त्यांचा जीव वाचविण्यात आला. हा मांजा दोरा जणू या पक्ष्यांच्या जिवावर उठू लागला आहे.गेल्या आठवडाभरात चिमणी, कावळा, स्पॉटेड मुनिया ते आज, रविवारी धनेश या पक्ष्यांचा केवळ पतंगाचा दोरा असणाऱ्या मांजामध्ये पंख अडकून जीव जाता-जाता वाचला आहे. आज तर जयदीप जाधव यांना जुना बुधवार पेठ येथे ‘धनेश’ (कॉमन ग्रे हॉर्नबिल) पक्ष्याच्या पंखांत मांजा दोरा अडकला होता. त्यामुळे तो जखमी अवस्थेत पडला होता. त्याला जयदीप जाधव यांनी पांजरपोळ येथे उपचारासाठी आणले. त्यावर डॉ. राजकुमार बागल यांनी उपचार करून मुक्त केले. या आठवड्यात विविध जातींचे दहा पक्षी पतंगाच्या मांजा दोऱ्यामुळे जखमी होऊन रस्त्यावर पडले होते. त्यांना पक्षिप्रेमी नागरिकांनी पांजरपोळ येथे औषधोपचारांसाठी दाखल केले होते. वेळेवर उपचार करून त्यांचा जीव वाचविण्यात आला. मात्र, ज्यांच्यामुळे इतकी गंभीर बाब झाली, त्या पतंगप्रेमींनीही पतंग उघड्या मैदानावर उडवावेत, एवढी जरी काळजी घेतली तरी या पक्ष्यांचा जीव वाचेल. (प्रतिनिधी)अशा पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी सदैव तयारअशा पद्धतीने अपघात झालेल्या पक्ष्यांवर आम्ही उपचार करण्यासाठी सदैव तयार आहोत. मात्र, पतंगाच्या मांजापासून धोका पोहोचून हे पक्षी गंभीर जखमी होऊन मरत आहेत, ही बाब मनाला खिन्न करणारी आहे. त्यामुळे पतंग उडविणाऱ्यांनी पक्ष्यांचा जीव जाणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच अशा प्रकारे कुठेही पक्षी रस्त्यावर पडले तर त्यांच्यावर आम्ही उपचार करण्यासाठी सदैव तयार आहोत. - डॉ. राजकुमार बागल(पांजरपोळ संस्था, कोल्हापूर )