टिंबर मार्केट परिसरात तरुणास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 17:32 IST2021-02-26T17:31:05+5:302021-02-26T17:32:07+5:30
Crime News Kolhapurnews- मावा तंबाखू न दिल्याच्या रागातून वीट व लाथाबुक्यांनी केलेल्या मारहाणीत तरूण जखमी झाला. अतिश युवराज सकट (वय २७, रा. गंजीमाळ) असे जखमींचे नाव आहे.

टिंबर मार्केट परिसरात तरुणास मारहाण
कोल्हापूर : मावा तंबाखू न दिल्याच्या रागातून वीट व लाथाबुक्यांनी केलेल्या मारहाणीत तरूण जखमी झाला. अतिश युवराज सकट (वय २७, रा. गंजीमाळ) असे जखमींचे नाव आहे.
याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात चार संशयितांवर गु्न्हा दाखल झाला. अनिकेत रविंद्र पोवार, सौरभ राजेश कांबळे, ओंमकार कांबळे, विपुल पाटील (सर्व रा. टिंबर मार्केट, गंजीमाळ) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,अतिश हा जेवण वाढण्याचे काम करतो. तो बुधवारी (दि. २४) रात्री वाढपी कामाचे पैसे आणण्यासाठी ठेकेदाराकडे गेला होता . तेथून तो पायी घरी जात असताना संशयित विपुल व ओमकार यांनी त्याला अडविले. त्याने मावा दिला नाही म्हणून चौघांनी वीट व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची फिर्याद जुना राजवाडा पोलिसांत दिली.