शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

कोपार्डेत मोटारसायकल अपघातात तरुण ठार

By admin | Updated: November 1, 2015 00:56 IST

गाडीवरील ताबा सुटला

कोपार्डे : कोपार्डे (ता. करवीर) येथे ताबा सुटल्याने मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात तरुण ठार झाला. तेजपाल प्रभाकर कांबळे (वय २७, रा. पाटपन्हाळा, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री उशिरा झाला असावा, अशी घटनास्थळावर चर्चा होती. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तेजपाल कांबळे (जाधव) हा कोल्हापूर येथे डी. मार्ट या शॉपिंग सेंटरमध्ये कामाला होता. रात्री दहानंतर डी. मार्ट बंद झाल्यानंतर तो कामावरून आपल्या गावी पाटपन्हाळ्याला परतत असता कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील कोपार्डे गावच्या पूर्वेस असणाऱ्या गणेश नाल्यातील एका नागमोडी वळणावर त्याचा गाडीवरील ताबा सुटला असावा. यामुळे विरुद्ध बाजूला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर तो चालवत असलेली मोटारसायकल आदळली. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यासह मोटारसायकलही रस्त्याशेजारी असणाऱ्या नाल्यात पडली होती. या ठिकाणी गवत व झुडपे असल्याने हा अपघात कोणाच्याही लवकर लक्षात आला नाही. रात्री एमआयडीसीतून कामावरून परतत असणाऱ्या काही युवकांना रस्त्यावर फुटलेल्या अवस्थेतील मोबाईल दिसला. या युवकांनी रस्त्याच्या नाल्यात पाहिले असता तेजपाल व त्याची मोटारसायकल दिसली. या युवकांनी मोबाईलमधील सीमकार्ड आपल्या मोबाईलमध्ये घालून फोन केला असता हा युवक पाटपन्हाळा येथील असल्याचे लक्षात आले. त्याच्या नातेवाइकांना या अपघाताबाबत कल्पना मिळाल्यानंतर नातेवाईक घटनास्थळी आले. त्यांनी तेजपालला कोल्हापूर येथे सरकारी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. तेजपालच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ आहेत.