शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
3
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
5
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
6
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
7
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
8
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
9
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
10
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
11
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
12
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
13
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
14
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
15
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
16
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
17
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
18
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
19
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
20
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात आज ‘यलो अलर्ट’; पावसाच्या उघडिपीमुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत घट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 12:04 IST

अद्याप ३८ बंधारे पाण्याखाली: धरणातील विसर्ग मात्र कायम: पडझडीत नऊ लाखांचे नुकसान

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. विशेष म्हणजे दुपारी कडकडीत ऊन पडल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. जून महिन्यातच धुवाधार पाऊस कोसळल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. दिवसभरात पंचगंगेची पातळी फुटाने कमी झाली असून, अद्याप ३८ बंधारे पाण्याखाली आहेत. सायंकाळनंतर मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. गुरुवारी दिवसभरात अधूनमधून सरी कोसळत होत्या. मात्र, शुक्रवारी सकाळपासून पूर्णपणे उघडीप राहिली. दुपारी तर चक्क ऊन पडले होते. धरणक्षेत्रातहीपाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आला आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ३,१००, वारणातून १,७३५ तर दूधगंगातून १,६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पावसाची उघडीप असली तरी नद्यांचे पाणी संथगतीने कमी होत आहे. पंचगंगा नदीचे पाणी दिवसभरात फुटाने कमी झाले आहे. अद्याप ३८ बंधारे पाण्याखाली असून, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ८.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गगनाबवड्यात ३३, भुदरगडमध्ये १२, आजरा २४, तर चंदगड १६.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.दरम्यान, हवामान विभागाने शुक्रवारी दुपारी एकपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता, पण उघडीप राहिली. आज, शनिवारी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ दिला असून उद्या, रविवारपासून दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ राहील, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

पडझडीत नऊ लाखांचे नुकसानशुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यत २५ खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. यामध्ये ९ लाख ४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.