शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

यंदाचा फुटबॉल हंगाम डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात--खेळाडूंसह रसिकांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 11:46 AM

मागील वर्षी के. एस. ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धा २४ नोव्हेंबर २०१८ ला सुरू होऊन ५ जानेवारी २०१९ ला संपली, तर यंदा २४ नोव्हेंबर उलटून गेली तरी अद्यापही स्पर्धेचे काहीच सुतोवाच के. एस. ए.कडून झालेले नाही; त्यामुळे खेळाडूंसह रसिकांनाही फुटबॉल हंगाम कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

ठळक मुद्देत्यानंतर पुढील स्पर्धाच झाल्या नाहीत; त्यामुळे यंदाच्या हंगामाला प्रथम पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

कोल्हापूर : यंदा कोल्हापूरचाफुटबॉल हंगाम नियमितपणे नोव्हेंबरच्या तिसºया आठवड्यात सुरू होतो; पण तो अद्यापही सुरू झालेला नाही; त्यामुळे फुटबॉल खेळाडूंसह रसिकांनाही प्रतीक्षा लागून राहिली आहे. फुटबॉल जाणकारांच्या मते हा हंगाम ‘केएसए’ वरिष्ठ लीग स्पर्धेच्या माध्यमातून डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोल्हापूर आणि फुटबॉल यांचं नातं घट्ट आहे; त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर फुटबॉल रसिकांचे पाय आपोआप शाहू स्टेडियमकडे वळतात; मात्र यंदा प्रथम पूर परिस्थिती, त्यानंतर अवकाळी परतीचा पाऊस, आदींमुळे फुटबॉल हंगाम लांबला आहे. त्यात मागील हंगामात एका स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे पोलीस प्रशासनाने पुढील स्पर्धा कार्यक्रमालाच बंदी घातली. त्यानंतर पुढील स्पर्धाच झाल्या नाहीत; त्यामुळे यंदाच्या हंगामाला प्रथम पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने घालून दिलेली आचारसंहिता फुटबॉलमध्ये सहभागी होणाºया १६ संघांना पाळावी लागणार आहे.

मागील वर्षी के. एस. ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धा २४ नोव्हेंबर २०१८ ला सुरू होऊन ५ जानेवारी २०१९ ला संपली, तर यंदा २४ नोव्हेंबर उलटून गेली तरी अद्यापही स्पर्धेचे काहीच सुतोवाच के. एस. ए.कडून झालेले नाही; त्यामुळे खेळाडूंसह रसिकांनाही फुटबॉल हंगाम कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. जाणकाराच्या मते यंदाचा फुटबॉल हंगाम के. एस. ए. वरिष्ठ लीगच्या माध्यमातून डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात सुरू होण्याची शक्यता वर्तविली आहे.स्पर्धेचा गेल्या पाच वर्षांतील कालावधी असा, २३ नोव्हेंबर २०१४ ते २२ डिसेंबर २०१४ (२९ दिवस), ३ जानेवारी २०१६ ते ९ फेबु्रवारी २०१६ (३३ दिवस), २८ नोव्हेंबर २०१६ ते २० जानेवारी २०१७ (५३ दिवस), १९ डिसेंबर २०१७ ते ४ फेबु्रवारी २०१८ (४७ दिवस), तर मागील वर्षी २४ नोव्हेंबर २०१८ ते ५ जानेवारी २०१९ (४२ दिवस).मागील वर्षी प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ने १६ गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकाविला होता, तर गतविजेत्या पाटाकडील तालीम संघास १४ गुणांसह दुसºया, तर बालगोपाल तालीम मंडळास १३ गुणांसह तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. यंदा सर्वच १६ संघांनी चांगली कामगिरी करण्यासाठी कंबर कसली आहे. संघाचा सराव गांधी मैदान, तपोवन मैदान, पोलीस मैदान, शिवाजी स्टेडियम, आदी ठिकाणी सुरू आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल