शहरं
Join us  
Trending Stories
1
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
2
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार
5
Hardik-Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा, कृणाल पांड्याच्या फोटोवर नताशाची कमेंट; चर्चांना उधाण
6
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
7
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
8
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
9
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
10
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
11
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
12
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
13
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
14
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
15
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
16
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
17
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
18
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
19
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
20
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

यशवंतराव चव्हाण यांची जयंती कोल्हापुरात ‘यशवंत उत्सव’ म्हणून साजरी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:20 AM

कोल्हापूर : नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची येत्या शुक्रवारी (दि.१२) होत असलेली ...

कोल्हापूर : नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची येत्या शुक्रवारी (दि.१२) होत असलेली जयंती कोल्हापुरात यशवंत उत्सव म्हणून साजरी होणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पुढाकाराने यशवंतरावांच्या जीवनावर आधारीत वकृत्व स्पर्धा, बीज भाषण, बक्षीस वितरण आणि कोल्हापुरातील पहिल्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी असे भरगच्च उपक्रम ठरवण्यात आले आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विजयसिंह पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्राची जडणघडणीतील प्रेरणादायी कार्य, देशाचे अर्थ, परराष्ट्र, संरक्षण, गृह अशी मंत्रिपदे सांभाळून उपपंतप्रधान म्हणून उतुंग कार्य करणाऱ्या यशवंतरावांची ओळख नव्या पिढीला व्हावी म्हणून प्रतिष्ठानने यावर्षीपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत गुरुवारी (दि.११) तीन गटांत वकृत्व स्पर्धा होणार आहेत. कोल्हापूर शहरातील प्राथमिक शाळेतील १२, ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेतील १२ आणि कराडमधील १६ अशा ३८ विद्यार्थ्यांची स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शाहू स्मारक होणाऱ्या स्पर्धेतील तीन गटातून प्रत्येकी ४ असे १२ पुरस्कार विजेते विद्यार्थी निवडले जाणार आहेत. त्यांना संध्याकाळी साडेचार वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण होणार आहे. ५००१, ३००१, २००१, १००१ रुपये रोख, सन्माचिन्ह, प्रशस्तिपत्र, कृष्णाकाठ हे पुस्तक भेट म्हणून दिले जाणार आहे. शुक्रवारी जयंती दिवशी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेत प्रतिष्ठानने उभारलेल्या यशवंतरावांच्या पुतळ्याला अभिवादन केले जाणार आहे.

यावेळी प्रतिष्ठानचे अशोक पोवार, रमेश मारे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर उपस्थित होते.